06 July 2020

News Flash

VIDEO: …आणि मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी ४८ हजार जणांनी कॉन्सर्ट थांबवला!

फुटबॉल नसानसांत भिनलेल्या लोकांची गोष्ट

फुटबॉल नसानसांत भिनलेल्या अर्जेंटिना येथील ला प्लाटा या शहरातील कॉन्सर्टच्यावेळी हा प्रकार पाहायला मिळाला.

एखाद्या कॉनर्स्टसाठी एक दोन नाही तर चक्क ४८ हजार लोक जमतात. मात्र, देशाच्या फुटबॉल संघाचा सामना पाहण्यासाठी हे सर्व लोक कॉन्सर्ट थांबवून मोठ्या पडद्यावर सामना पाहू लागतात. फुटबॉल संघातील स्टार खेळाडूही मग चाहत्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवत गोल्सची हॅटट्रिक करतो. त्यानंतर कॉन्सर्टच्याठिकाणी एकच जल्लोष होतो. फुटबॉल नसानसांत भिनलेल्या अर्जेंटिना येथील ला प्लाटा या शहरातील कॉन्सर्टच्यावेळी हा प्रकार पाहायला मिळाला.

डव्हच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीतली कृष्णवर्णीय मॉडेल म्हणते..

काही दिवसापूर्वी अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीमध्ये इक्वाडोअरवर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे अर्जेंटिना मोठ्या थाटात विश्वचषकासाठी पात्र ठरला. या सामान्याचे खास वैशिष्ट्य राहिले ते अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीची हॅटट्रीक. हा सामाना सुरु होता त्याच वेळी ला प्लाटा येथील एस्टॅण्डीओ युनिको दी ला प्लाटा या मैदानात स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता ‘यू टू या बॅण्ड’चा परफॉर्मन्स होणार होता. मात्र, त्याचवेळी सामना रंगात आल्याने चाहत्यांना त्याचा आनंद लुटता यावा म्हणून हा कार्यक्रम चक्क दीड तास पुढे ढकलण्यात आला. बॅण्डमधील वादकांसहित उपस्थित असणाऱ्या ४८ हजार फुटबॉलप्रेमींनी तो सामना कॉन्सर्टच्या स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर पाहिला. त्यातही मेस्सीने एकापाठोपाठ एक तीन गोल केल्यानंतरचा कल्ला अवर्णनीय असाच होता. सामना संपल्यानंतर अनेकांनी बॅण्डच्या तालावर विजयोत्सव साजरा केला. या अनोख्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2017 5:43 pm

Web Title: 48 000 people concert stop to see lionel messi score hattrick against ecuador
टॅग Lionel Messi
Next Stories
1 ‘जलपरी’मुळे रस्त्यातल्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं जाईल का?
2 Viral Video : बाबागाडीतून मुलांना फिरवताय? मग हे पाहाच
3 Viral Video : अशी गंमत केली तर या उंच काचेच्या पुलावर कोण बरं जाईल?
Just Now!
X