स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत मिळू शकतं. यासाठी केवळ एकच अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे पेट्रोल भरल्यानंतर पैसे देताना तुम्हाला ‘भीम’ अॅपचा वापर करुन एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार करणं आवश्यक आहे.

एसबीआयच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास आणि भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार केल्यास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळू शकतं. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपयांचं पेट्रोल भरावं लागेल. त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या 100 रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. (भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर <UPI Reference No. (12-Digit)> <DDMM> टाईप करून 9222222084 या फोन नंबरवर SMS पाठवा. या SMSसाठी नॉर्मल चार्जेस लागतील.) त्यानंतर जर तुमचा नंबर निवडण्यात आला तर तुमच्या मोबाइक क्रमांकावर मेसेजद्वारे कळवलं जाईल आणि तुम्ही 400 रुपये कॅशबॅक म्हणजेच जवळपास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकणार आहात. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे.


डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि भीम अॅपच्या युजर्सची संख्या वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच ‘BHIM’ होय. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप बनवले आहे.