25 August 2019

News Flash

‘या’ पाच मौल्यवान वस्तूंचे मालक आहेत मुकेश अंबानी

जगभरातील सर्वात महागड्या पाच गोष्टींचे मालक मुकेश अंबानी आहेत.

मुकेश अंबानी हे आपल्या देशातीलच नाही तर जगातील श्रीमंत लोकांमध्ये येतात. ते त्यांच्या शाही राहणीमानासाठी खूप प्रसिद्ध देखील आहेत. गेल्या वर्षी अंबानी यांची मुलगी इशाच्या लग्नाला जगभरातून मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. रिपोर्टनुसार, या शाही विवाहला ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. जगभरातील सर्वात महागड्या पाच गोष्टींचे मालक मुकेश अंबानी आहेत.

– दुसऱ्या क्रमांकाचे महागडे घर
अंबानी यांचे एंटीलिया घर जगातील दुसऱ्या क्रमाकाचे महागडे घर आहे. जे भारतातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे. २७ माळ्याच्या या घरात एकूण ६०० नोकरचाकर आहेत, जे घराला सांभाळतात. अंबानीच्या घरात प्रत्येक लहान-सहान गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. २७ माळ्याचे हे घर २ बिलियन डॉलर खर्डून तयार केले आहे. हेल्थ स्पा, सलून, बॉलरुम, स्नो रूम, खासगी चित्रपटगृह, ३ स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत. या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील एवढी जागा असून या घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड्स देखील आहेत.लंडनमधील ‘बकिंघम पॅलेस’ जगातील सर्वात महागडे आणि अलिशान घर आहे.

– खासगी विमान
मुकेश अंबानींचे विमान म्‍हणजे एखाद्या उडत्‍या महालासारखे आहे. त्यांच्याकडे स्वतःचे खासगी एअरबस – ३१९ जेट विमान असून, या जेट ची किंमत १०० मिलियन डॉलर आहे. हे जेट मुकेश यांनी आपली पत्नी नीता यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिले होते. या विमानामध्ये ऑफिस केबिन, उत्तम प्रतीची म्युझिक सिस्टम, सॅटेलाईट टीव्ही आणि वायरलेस कम्युनिकेशन इत्यादी सोयी आहेत. या विमानामध्ये पाहुण्यांना आराम करता यावा या करिता आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण असे शयनकक्षही आहेत.

– बुलेट प्रूफ BMW760Li
मुकेश अंबानी BMW760Li या गाडीमध्ये प्रवास करीत असून, ह्या गाडीची किमात तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. ही गाडी बुलेटप्रूफ असून, या गाडीमध्ये कॉन्फरंस सेंटर, आणि टीव्ही स्क्रीन इत्यादी सोयी आहेत. भारतातील सर्वात महागडी गाडी आहे.

– पाण्यावरील महल
मुकेश अंबानी यांच्याकडे असणाऱ्या यॉटची किंमत एक मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. या यॉटमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. एकप्रकारचा पाण्यावर तरंगणारा महलच आहे. ५८ मीटर लांबी आणि ३८ मीटर उंची असणारे यॉटवर सोलर ग्लास रूफ आहे. आतमध्ये पियानो बार, लाउंजसह अनेक शाही सुविधा आहेत.

– पत्नीला महागडे गिफ्ट
मुकेश अंबानी यांनी पत्नीला वाढदिवसाला Maybach 62 ही कार गिफ्ट केली आहे. या कारची किंमत एक मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. फक्त ५.४ सेंकदात ० ते १०० किमी धावू शकते अशी या गाडीची मर्यादा आहे.

First Published on January 15, 2019 3:05 pm

Web Title: 5 most expensive things owned by mukesh ambani