News Flash

5 वर्षांचा चिमुकला वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट चालवतोय Land Cruiser, व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी हैराण

आई-वडिलांविरोधात होणार कारवाई...

लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच बाइक किंवा कार चालवण्याची हौस असते. पण त्यांनी कितीही हट्ट केला तरी आई-वडिल कधी आपल्या लहानग्यांच्या हातात गाडी देत नाही. मात्र, पाकिस्तानमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून यात अवघ्या पाच वर्षांचा मुलगा चक्क Land Cruiser एसयूव्ही चालवताना दिसतोय.

Land Cruiser चं नाव ऐकून तुम्ही हैराण झाला असाल की, इतका छोटा मुलगा इतकी मोठी आणि दणकट गाडी कशीकाय चालवू शकतो? शिवाय त्याचे पाय ब्रेक आणि रेसपर्यंत कसे पोहोचतील? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आले असतील. तर, हा मुलगा पाय पोहोचत नाहीत म्हणून चक्क उभं राहून गाडी चालवत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा लहानगा एखाद्या मोकळ्या रस्त्यावरही नाही तर थेट वर्दळीच्या रस्त्यावर ही एसयूव्ही सुसाट पळवताना दिसतोय. पाकिस्तानच्या मुल्तान शहरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय.

आणखी वाचा- बापरे…! ११ वर्षांचा मुलगा YouTube वर व्हिडिओ बघून शिकला हॅकिंग, नंतर वडिलांनाच अश्लील फोटो…

व्हिडिओ पाहून नेटकरी चिमुकल्याला गाडी चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल त्याच्या पालकांवर संताप व्यक्त करत आहेत. तर, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीसीटीव्ही आणि गाडीच्या नंबरद्वारे गाडी मालकाचा शोध घेतला जात असून चिमुकल्याच्या आई-वडिलांविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती पाकिस्तानमधील वाहतूक पोलिसांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 11:27 am

Web Title: 5 year old driving a land cruiser in pakistan video viral sas 89
Next Stories
1 धक्कादायक! सुलभ शौचालयात अंडे-मटणाची विक्री, देशातल्या सर्वात स्वच्छ शहरातला प्रकार
2 सेक्स कोणासोबत करणार हे २४ तास आधीच पोलिसांना सांगणं बंधनकारक; न्यायालयाकडून अजब निर्बंध
3 पत्नीने ‘खरडपट्टी’ काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X