News Flash

अबब! इतकी मोठी इडली? तीही अभिनेत्याचा चेहरा कोरलेली…

अभिनेत्याला फॅन्सकडून विशेष भेट

अभिनेते आणि त्यांचे चाहते याविषयी बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. कधी हे अभिनेते आपल्या चाहत्यांसाठी एखादी विशेष गोष्ट करतात तर कधी चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्यांसाठी आपली शक्कल लढवत काहीतरी खास सेलिब्रेशन करतात. एखाद्या अभिनेत्याविषयी असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी हे चाहते काय करतील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना तामिळ अभिनेते अजित कुमारच्या एका फॅनक्लबने काय केलंय…

अजित कुमार यांच्या चाहत्यांनी तब्बल ५७ किलोंची इडली तयार केली आहे. इतकेच नाही तर या मोठ्या इडलीवर त्यांनी अजित कुमार यांचा चेहराही कोरला आहे. असं करण्यामागचं कारण काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. २४ ऑगस्ट रोजी अजित कुमार यांचा ‘विवेगम’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. अजित कुमार यांचा हा ५७ वा चित्रपट असल्याने ही ५७ किलोंची इडली तयार करण्यात आली आहे.

ही इडली चेन्नईच्या रॉयापूरममधील भारत थिएटर येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही इडली तमिळनाडू सामैयाल कलाई तोलीजालर मुनेत्र संगम यांनी बनवली आहे. त्यांनी याआधी अब्दुल कलाम, तामिळ कवी भरतीयार, मदर तेरेसा, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांचाही चेहरा इडलीवर कोरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 11:30 am

Web Title: 57 kg idli made by fans of ajith kumar tamilnadu carved face on it
Next Stories
1 Viral Video : ही स्कूटर पाहिलीत? अपघातानंतरही धावत होती एकटीच
2 ‘गोपनियते’च्या निर्णयावर ट्विपल्सची जाहीर टीवटीव!
3 तिला मिळाला पहिली नागा लेडी पायलट होण्याचा मान
Just Now!
X