भारतीय लष्कराची प्रसिद्ध मोटारसायकल ट्रूप ‘टॉर्नेडो’नं नवा विश्वविक्रम रचला आहे. एकाच मोटारसायकलवर ५८ जण स्वार होऊन टॉर्नेडो ट्रुपनं १२०० मीटरपर्यंत प्रवास करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. बंगळुरूच्या येलहांका विमानळावर ही चित्तथरारक कवायत प्रत्यक्षात उतरली. तिरंगी वस्त्रे परिधान केलेल्या या ताफ्याचं नेतृत्त्व केलं होतं रामपाल यादव यांनी.

एका हातात बाळ, दुसऱ्या हातात गन; धाडसी पोलिसाने केला दरोडेखोरांचा खात्मा

Viral : जिद्दी मालकापुढे सरकारनेही हात टेकले

एका मोटारसायकलवर ५८ जणांचं संतुलन कायम ठेवून रामपाल यादव यांनी मोटारसायकल चालवली. मोजक्या लोकांना ‘याचि देहि याचि डोळा’ हा अनुभव घेता आला. त्यांच्या या कामगिरीची दखल ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नंही घेतली आहे. टॉर्नेडोच्या नावावर आतापर्यंत १९ विश्वविक्रम आहेत. २०१५ मध्ये तीन मोटारसायकलवर ३२ जवानांनी जलद वेगात पिरॅमिड रचण्याचा विक्रम केला होता. फक्त ५६ सेकंदात पिरॅमिड रचून त्यांनी १ किलोमीटर एवढा प्रवास केला होता.