News Flash

“मोदी साब..” म्हणत सहा वर्षांच्या मुलीने पंतप्रधानांकडे केली तक्रार; व्हिडीओ झाला व्हायरल

पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीचं उत्तरं द्यावं असं अनेकांनी म्हटलंय

मागील वर्षभरापासून अधिक काळ झाला अनेक शाळा आणि कॉलेजमधील लेक्चर्स हे ऑनलाइन माध्यमातून होत आहे. करोनामुळे शाळा, कॉलेजेस बंद असल्याने ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवले जात आहेत. ऑनलाइन वर्गांमधील धम्माल आणि गोंधळाची सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चा असते. तसा एका वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही या ऑनलाइन क्लासेसची सवय झालीय. मात्र या ऑनलाइन क्लाससोबतच देशामधील करोनासंदर्भातील बातम्या, घरचा अभ्यास अशा अनेक गोष्टींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. याचीच झलक सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका लहान मुलीच्या व्हिडीओमधून पहायला मिळत आहे.

काश्मीरमधील सहा वर्षांच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील लहान मुलगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑनलाइन माध्यमातील शिकवणीनंतर देण्यात येणाऱ्या घरच्या अभ्यासासंदर्भात तक्रार करताना दिसत आहे. “छोटे बच्चो को इतना काम क्यू रखते हो मोदी साब?”, असा प्रश्न ही मुलगी थेट देशाच्या पंतप्रधानांना विचारताना व्हिडीओत दिसते. “बडे बच्चे जो सातवी आठवी मे है उन्हा जादा होमवर्क देना चाहिऐ,” असंही ही चिमुकली या व्हिडीओत म्हणता दिसते. १० ते २ वाजेपर्यंत मला ऑनलाइन शिकवणीला बसावं लागत असल्याची तक्रारही या मुलीने केलीय. इंग्रजी, गणित, उर्दू, पर्यावरण, कंप्युटर अशा अनेक विषयाच्या लेक्चर्सला मला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावावी लागत आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या मुलीची तक्रार फारच गोंडस असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओने यासंदर्भातील उत्तर द्यावं अशी मागणी केलीय. नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

एकंदरितच या प्रतिक्रिया पाहता या मुलीची अडचण महत्वाची असल्याची मात्र त्याचवेळेस तक्रारीपेक्षा तिच्या गोंडसपणाचं आपल्याला अधिक कौतुक असल्याचं अनेकांनी म्हटल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 11:20 am

Web Title: 6 year old kashmiri girl question for modi saab is the cutest video on internet today scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘लस नाही तर दारू नाही’, ‘या’ जिल्ह्यात दारूच्या दुकानासमोर लागल्या नोटीसा
2 पायरेटेड CD बाळगल्याप्रकरणी मृत्यूदंड; फायरिंग स्वॉडने नातेवाईकांसमोरच केली त्याच्या शरीराची चाळण
3 VIDEO: भरदिवसा ब्रीजवरुन नदीत फेकला करोना रुग्णाचा मृतदेह; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Just Now!
X