खेळण्यांशी खेळून कोणी कोट्यवधी कमावल्याचं तुम्ही कधी ऐकलंत का? पण, एक मुलगा असाही आहे जो फक्त खेळण्यांशी खेळतो, त्यांच्यांबद्दल कधी भरभरून बोलतो तर कधी तक्रार करतो आणि यातून तो थोडेथोडके नाही तर कोट्यवधी रुपये कमावतो.

रायन असं त्याचं नाव असून या वर्षांत यूट्युब चॅनेलमार्फत सर्वाधिक पैसे कमावलेल्या टॉप दहा युट्यूबरमध्ये त्याचा समावेश आहे. रायन फक्त सहा वर्षांचा असून त्याचं वार्षिक उत्पन्न हे ११ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७० कोटींच्या आसपास असल्याचं ‘फोर्ब्स’नं म्हटलं आहे. १ जून २०१६ पासून ते १ जून २०१७ या वर्षभराच्या काळातलं हे रायनचं उत्पन्न आहे. खेळण्यांबद्दल समीक्षण करून रायन दरमहा सहा कोटींच्या आसपास कमावतो. ‘Ryan ToysReview’ हा रायनचा स्वत:चा युट्युब चॅनेल आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या खेळण्यांसोबत खेळतो. ही खेळणी त्याला कशी वाटली याबद्दल तो भरभरून बोलतो. कधी कधी छोटा रायन तक्रारही करतो.

Video : हत्तीचा प्रवासी बसवर हल्ला, गाडीत अडकलेल्या चालकाची अखेर सुटका

३५ वर्षांनंतर ‘या’ देशानं उठवली चित्रपटांवरील बंदी

५० लाखांहून अधिक लोकांनी रायनचा युट्युब चॅनेल सबस्क्राईब केला आहे. रायनची आई प्राध्यापक होती. पण रायनसाठी तिने आपली नोकरी सोडली. रायन खेळण्यांशी खेळत असताना त्याच्या आईनं त्याचा गंमत म्हणून व्हिडिओ तयार केला होता. छोटा रायन आपल्या खेळण्यांबद्दल भरभरून बोलत होता. निरागस, गोंडस रायनंचं खेळण्याबद्दलचं समीक्षण सगळ्यांनाच आवडलं आणि तेव्हापासून रायन सगळ्यांच्या आवडीता समीक्षक झाला.