23 November 2017

News Flash

जिवंत माणसाच्या शरीरात सापडल्या चक्क ७५ टाचण्या

डॉक्टरही चक्रावून गेले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 19, 2017 1:29 PM

राजस्थानमधील कोटा शहरात राहणाऱ्या बद्रीलाल मीणा यांच्या शरीरात टाचण्या सापडल्या .

जिवंत माणसाच्या शरीरात टाचण्या सापडल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मग तर या माणसाबद्दल जाणून घ्याच. राजस्थानमध्ये राहणाऱ्या या माणसाच्या शरीरात एक दोन नाही तर तब्बल ७५ टाचण्या सापडल्या असून, हे पाहून डॉक्टरांसहित त्यांचे कुटुंबिय देखील चक्रावून गेले आहे.

राजस्थानमधील कोटा शहरात राहणारे बद्रीलाल मीणा यांच्या शरीरात या टाचण्या सापडल्या आहेत. बद्रीलाल रेल्वे कर्मचारी म्हणून काम करतात. काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत होतं. मधुमेहाचा त्रास आणि टाचांचं दुखणं अधिकच बळावत गेल्याने ते रुग्णालयात गेले होते. बद्रीनाथ यांनी जेव्हा एक्स-रे काढला तेव्हा त्याच्या गळ्याकडील भागात ४० तर हाताकडच्या भागात १० टाचण्या आणि उजव्या पायात तब्बल २५ टाचण्या आढळल्यात. जेव्हा त्यांचे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांसहित सारेच या प्रकाराने चक्रावून गेले आहेत. या टाचण्या त्याच्या शरीरात गेल्या कशा याचे उत्तर खुद्द बद्रीलालनांदेखील माहिती नाही. ५६ वर्षांच्या बद्रीलाल यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरातून या टाचण्या काढण्याची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

First Published on May 19, 2017 1:29 pm

Web Title: 75 pins found in rajasthan man body