23 November 2017

News Flash

६० वर्षांपासून ती महिला आहे उपाशी

ऐकावे ते नवलच

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 12:00 PM

मध्यप्रदेशमधील ७५ वर्षांच्या सरस्वतीबाई

पोटात खवळलेली भूक आपल्याला अक्षरशः वेडी करुन सोडते. तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता? एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, फार फार तर मन मारून तुम्ही एक आठवडा राहू उपाशी राहू शकाल. तेही कसेबसे. पण, त्यापुढे मात्र अवघड आहे. पण मध्य प्रदेशच्या धामनोदमधील एका महिलेबाबतचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या महिलेने गेल्या ६० वर्षांपासून काहीच खाल्लेले नाही. आता इतकी वर्षं या महिलेने काही खाल्ले नाही तर ती जिवंत कशी? आणि तिने असे का केले? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

Viral Video : अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी शोमधील ‘तो’ बॉलिवूड डान्स हीट

तर सरस्वतीदेवी नावाच्या या महिलेने मागील ६० वर्षांपासून अन्न खाल्लेले नाही. आता ती महिला ७५ वर्षांची आहे. ही महिला केवळ चहा आणि पाण्यावरच जगते. या महिलेचा विवाह झाल्यावर ती जेव्हा पहिल्यांदा बाळंत झाली तेव्ही तिला टायफाईड झाला. या आजारपणात तिने काहीही खाल्ले की तिला उलटी होत असे. तिने अनेक उपाय करून पाहिले मात्र तिचा त्रास कमी झाला नाही. अनेक उपचार करूनही फरक न पडल्याने अखेर तिने औषधे घेणेही बंद केले. तेव्हापासून ही महिला उपाशीच राहते. सध्या ती केवळ चहा आणि पाणी यावरच जगत आहे.

या महिलेला पाच मुले असून जेवणाबाबत विचारले असता ती हसून नकार देते. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ पाणी आणि चहावर जगणाऱी ही महिला ३ किलोमीटर अंतर चालत आपल्या शेतात जायची. इतकेच नाही ती दिवसातील ८ तास आपल्या शेतात कामही करायची. आता ही कामे तिने बंद केली असून ती घरीच असते.

वीरपत्नीची ‘ती’ पोस्ट हेलावून टाकणारी

First Published on September 13, 2017 12:00 pm

Web Title: 75 years old lady from madhya pradesh is live without food from last 60 years