याराना चित्रपटातील तेरे जैसा यार कहां… हे गाणं सर्वांनाच प्रचलित आहे. या गाण्यातून जिवाभावाची मैत्री दिसून येते. प्रत्येकाचे मित्र असतातच….लहानग्यांना कुत्रा आणि मांजर यांचा लळा असतो. हे दोन्ही त्यांचे चांगले मित्रही असतात. लहान मुलं आपला वेळ त्यांच्याबरोबर घालवतात. पण एका आठ वर्षीय मुलीचा चक्क ११ फूट लांबीचा अजगर मित्र आहे. हे वाचून शॉक झालात ना? पण हे खरे आहे. रॉयटर्सने याबाबतचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
इस्त्राइलमधील इनबर या आठ वर्षीय मुलाचा अजगर जिवलग मित्र आहे. इनबर अजगरासोबत घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते. ११ फूटी अजगराचा आकार पाहून अनेकांना घाम फुटेल पण इनबर आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली आहे.
इनबर पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. इनबरला लहानपणापासूनच प्राण्यासोबत खेळायला आवडते. ती त्यांच्यासोबतच वाढली आहे. इनबरने ११ फुटी अजगराचं नाव बेले असं ठेवलं आहे. करोना विषाणूमुळे लॉकडाउन होता तेव्हा इनबरने बेलेसोबतच सर्वात जास्त वेळ घालवला होता.
An eight-year-old Israeli girl’s favorite swimming buddy is her 11-foot yellow pet python called Belle https://t.co/XEsjdPQGam pic.twitter.com/V2IUna7T2F
— Reuters (@Reuters) October 8, 2020
इनबर आणि बेलेची ही पक्की मैत्री पाहून तेरे जैसा यार कहा…. असं म्हटल्याशिवाय आपण राहणार नाही…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 2:17 pm