रस्त्यावर भाजी विकणारी आठ वर्षांची ही मुलगी. ‘मी पोटापाण्यासाठी नाही तर आई वडिलांना शोधण्यासाठी या बाजारात भाजी विकते असं सगळ्यांना सांगते.’ समोर भाज्या, बाजूला लावलेला एक मोठा बोर्ड आणि आजूबाजूला शोध घेणारी तिची नजर, तिला अशा अवस्थेत पाहिल्यावर कोणालाही पाझर पुढेल. आज तरी माझे आई वडिल माझा शोध घेत इथे येतील एवढी भाबडी आशा या मुलीची आहे, म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासून चीनच्या एका बाजारात छोटी माओ भाजी विकत आहे.

वाचा : अटलांटिक महासागरात सापडलेल्या या ११ वर्षांच्या मुलीची थरारक कहाणी

माओचे आई वडिल ती एक महिन्यांची असताना तिला शेजारांच्या दारात सोडून पळून गेले. तेव्हा शेजारी राहणा-या ७० वर्षीय वृद्ध महिलेने माओचा संभाळ केला. आई बाप सोडून गेलेल्या या मुलीला वृद्धमहिलेने आपल्या पोटच्या पोरीपेक्षाही अधिक जपले. पण जशी माओ मोठी होत गेली तेव्हा मात्र तिला आपले आई वडिल नेमके कोण हा प्रश्न छळू लागला? आई वडिलांना आपल्याला असं दुस-यांच्या दारात का टाकून दिलं अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या बालमनाला पोखरून काढले. बिचारी वृद्ध आजी तरी काय उत्तर देणार?

viral : चीनच्या अनेक शाळांत दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी सक्तीची

शाळेतून आल्यानंतर मोओ भाजीचा छोटी गाडी घेऊन स्थानिक बाजारात येते. तिने आपल्या जवळ एक फलक लावला आहे. ”माझ्या आई वडिलांची मी वाट बघत आहे ते एक दिवस नक्की येतील आणि मला घेऊन जातील”. असे तिने या फलकावर लिहिले आहे. लहानमुलांसाठी काम करणा-या इथल्या एका स्थानिक संस्थेने माओला पहिल्यांदा पाहिले आणि तिची चौकशी केली. माओची गोष्ट त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली, कधीना कधी तिचे पालक ही पोस्ट वाचतील आणि आपल्या मुलीला घेऊन जातील अशी त्यांची आशा आहे.