उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे सा-या देशाचे लक्ष लागले आहे. पिता मुलायम आणि पुत्र अखिलेश यांच्या परिवारातील अंर्तगत कलहाने निवडणुकीला वेगळेचे वळण लाभले आहे पण इथे ऐकावे ते नवलच असेही प्रकार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चक्क १४ वेळ हरलेल्या एका बाबाने उमेदवारी अर्ज दाखल केला. आता तर एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेने देखील उमेदवारी अर्ज भरलाय. या आजींना वृद्धपकाळावे चालताही येत नाही अशा वेळी व्हिलचेअरवर उमेदवारी अर्ज भरालयाला आलेल्या आजींना पाहून सगळ्यांनी आश्चर्याने डोक्यावर हात मारला.

वाचा : ‘या’ मंदिरात राजकारण्यांना नो एंट्री

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी ९५ वर्षीय आजींनी अर्ज केला. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणा-या त्या सगळ्यात वृद्ध उमेदवार आहेत. आग्रा जिल्ह्यातील खैरागढ मतदार संघातून त्यांनी अर्ज भरला आहे. या आजीबाईंचे नाव जलदेवी आहे. त्यांना देशातील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. आता जर बोलण्याने देश सुधारत नसेल तर माझ्या हातातल्य काठीच्या जोरावर मी देश सुधारणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

वाचा : आनंद महिंद्रा यांच्या ट्विटने झाली त्याची बोलती बंद

उत्तर प्रदेशच्या मतदारांसाठी असे प्रकार काही नवे नाहीत. काही दिवसांपूर्वी ७३ वर्षीय फाक्क्ड बाबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हे बाबा १४ वेळा अपयशी झाले आहे. पण जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत निवडणुक लढवण्याचा पणच त्यांनी केला आहे. विसाव्या खेपेला ते यशस्वी होतील असा साक्षात्कार त्यांना झाला होता म्हणून २०१७ च्या निवडणुकीला देखील ते उभे राहिले आहे.