भारतीय वंशाच्या १२ वर्षांच्या मुलानं ब्रिटनमधली सर्वात प्रतिष्ठेची अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकून ‘चाईल्ड जिनियस’चा किताब पटकावला आहे. ब्रिटनच्या ‘फोर के’ टीव्ही चॅनेलवर नुकतीच ‘चाईल्ड जिनियस’ ही स्पर्धा पार पडली. यात राहुल दोशीनं आपल्या प्रतिस्पर्ध्याला १०-४ अशा फरकानं हरवत हा किताब पटकावला .

गेल्याच आठवड्यात प्रश्नमंजुषेत विचारल्या गेलेल्या सगळ्या प्रश्नांनी अचूक उत्तरं देत त्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्याची अफाट बुद्धिमत्ता पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. शनिवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत राहुलने १९ व्या शतकातील कलाकार विल्यम होलमन हंट आणि जॉन एवेरेट मिलियस यांच्याशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तर देत हा किताब पटकावला आहे.

Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?

आठवडाभर सुरु असलेल्या या कार्यक्रमात देशातील सर्वात हुशार अशा १९ मुलांनी सहभाग घेतला होता. या सगळ्यांना हरवत राहुलनं या प्रतिष्ठित किताबावर आपलं नावं कोरलं. त्याची बुद्धिमत्ता पाहता ब्रिटनमधल्या मानाच्या अशा मेन्सा बुद्धयांक स्पर्धेतही तो सहभागी होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे.

Viral Video : दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलताय? तुमचीही अशी गत होऊ शकते