03 August 2020

News Flash

इटलीमध्ये अस्वलाने केला बाप-लेकावर हल्ला, सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा

प्राणीप्रेमी संघटनांचा संताप...

(संग्रहित छायाचित्र)

इटलीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, इथे एका अस्वलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वडील आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपातून अस्वलाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे प्राणीप्रेमी संघटनांनी यावर संताप व्यक्त केला असून अस्वलाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत.

माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, ५९ वर्षीय फेबिओ मिस्सरोनी हे आपल्या २८ वर्षांचा मुलगा क्रिश्चियन याच्यासोबत माउंट पेलरच्या रस्त्याने जात होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला. याबाबत मीडियाशी बोलताना, क्रिश्चियनने सांगितले की, “अस्वलाने माझा पाय पकडला होता. मला अस्वलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी वडिलांनी त्याच्या पाठीवर उडी मारली. त्यामुळे मी अस्वलाच्या तावडीतून सुटलो पण माझ्या वडिलांच्या पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर आम्ही कसेबसे अस्वलाच्या तावडीतून सुटलो”.

दुसरीकडे, या घटनेनंतर ट्रेटिनो येथील गव्हर्नर मोरिजियो फुगत्ती यांनी कठोर निर्णय घेताना अस्वलाला मारुन टाकण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. तर, प्राणीप्रेमी संघटना अस्वलाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत. अस्वलाने त्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी हल्ला केला असू शकतो, असं प्राणीप्रेमी संघटनांचं म्हणणं असून त्यांनी अस्वालाच्या बचावासाठी ऑनलाइन मोहिम सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:01 am

Web Title: a bear in italy has been sentenced to death which attacked father and son sas 89
Next Stories
1 मेथी समजून कुटुंबाने चूकून गांजाच्या पानांची भाजी बनवून खाल्ली अन्…
2 हा फोटो कसला ओळखा पाहू? डोसा आणि ग्रहावरुन नेटकऱ्यांमध्ये जुंपली
3 असेही करोना योद्धे… टेडी बेअरही उतरले करोनाविरुद्धच्या लढाईत, त्यांच्या खांद्यावर ‘ही’ जबाबदारी
Just Now!
X