दोन वाघांच्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राण्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर पसंती दर्शवली जाते. तुम्ही वाघांच्या झुंजीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण अशी लढाई पाहिली नसेल. एका वाघिणीसाठी या दोन्ही वाघात जुंपल्याचं व्हिडिओहून दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ दक्षिण आप्रिकेतील टायगर कॅनियन (Tiger Canyon) येथील असल्याचं म्हटले जातेय. २०१३ मध्ये YouTube वर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. भारतीय वनआधिकारी सुधा रमन यांनी हाच व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केल्यामुळे पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत पाहू शकता वाघासोबत लढण्यासाठी दुसरा वाढ वेगानं धावत येतो आणि झेप घेत हेवतच हल्ला करतो. त्याच क्षणी दुसरा वाघही त्याला प्रतिकार करतो. दोघांमध्ये झुंज सुरू असताना वाघिण तेथे पोहचते. वाघिणही दूर उभे राहून दोघांतील लढाई पाहतेय, असे व्हिडीओत दिसतेय….

सुधा रमन यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहलेय की, ‘कधी वाघांना लढताना पाहिलेय. त्यांची ही लढाई कुस्तीपेक्षा कमी नाही.’ सुधा रमन यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताना YouTube व्हिडीओची लिंकही पोस्ट केली आहे.