ज्वालामुखीच्या पोटातून निघालेल्या तप्त लाव्हारसात एखादी वस्तू चुकून पडली तर तिचं काय होईल हे काही वेगळं सांगायला नको. खदखदत्या लाव्हारसातील उष्णतेनं कधी त्याची राख होईल हेही आपल्याला कळणार नाही. पण , नुकताच एका कॅमेरामननं एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कॅमेरा ज्वालामुखीजवळ हरवला होता. हा कॅमेरा कदाचित जळून भस्मसात झाला असेल असं त्याला वाटलं. बऱ्याच दिवसांनी कुतूहलापोटी त्यानं आपला कॅमेरा पाहिला तो अत्यंत चांगल्या अवस्थेत होता. इतकंच नाही तर दरम्यानच्या काळात ज्वालामुखीच्या परिसरसात काय घडलं यांचंही चित्रिकरण या कॅमेरात झालं होतं.

वाचा : समुद्रात हरवला कॅमेरा, पाहा तीन वर्षांनी काय झालं

इरिक स्ट्रोम यांनी हवाईमधली ज्वालामुखी पार्कमधला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा गोप्रो कॅमेरा कपारीत पडला होता. लाव्हारस थंड झाल्यानंतर त्यांनी आपला कॅमेरा शोधण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं तो चांगल्या स्थितीत होता. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तिथे जी उलथापालथ झाली ती या कॅमेरानं व्यवस्थित टिपली होती. याचा व्हिडिओ इरिकनं शेअर केला आहे जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.