19 September 2020

News Flash

व्हॉट अ गाय ! चक्क गाईला पुढे बसवून बाईकवरुन केला प्रवास, व्हिडीओ व्हायरल

शेजारुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटना मोबाइलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली

सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल याची शाश्वती नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क गाईला पुढे बसवून दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आपला शेजारी देश पाकिस्तानमधील आहे. या व्हिडीओत व्यक्ती अत्यंत आरामशीरपणे गाईला पुढे बसवून दुचाकी चालवताना दिसत आहे.

कुत्रा, मांजर यांना दुचाकीवरुन प्रवास करताना आपण पाहिलं आहे. पण एखादी व्यक्ती चक्क गाईला घेऊन प्रवास करताना आजपर्यंत पाहिलं नसेल. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या शेजारुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटना मोबाइलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

२८ सेकंदाच्या या व्हिडीओत शूट करणारी व्यक्ती हा पाकिस्तानी जुगाड आहे असं कौतुक करताना ऐकू येत आहे. महत्त्वाचं म्हणजे दुचाकीवरुन जाताना गायदेखील अत्यंत शांत बसलेली दिसते.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा जनावरावरील अत्याचार असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका युजरने माणूस खरा राक्षस आहे असं म्हटलं आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या ग्रामीण भागात महिन्याच्या सुरुवातीला काढण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 3:29 pm

Web Title: a cow sitting in front on bike in pakistan video goes viral
Next Stories
1 … म्हणून या रिक्षावाल्याने दिली फुकट प्रवासाची ऑफर
2 आनंद महिंद्रांनाही थिरकायचंय गरब्याच्या तालावर
3 VIDEO: या उमेदवारावर कुटुंबालाच भरवसा नाय! कुटुंबात सदस्य नऊ, पण मते फक्त पाच
Just Now!
X