विमान प्रवासातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या प्रवासात मजेशीर तर कधी धक्कादायक, कधी सुखद तर कधी दु:खद अशा अनेक घटना घडतात आणि सोशल मीडियाच्या व्याप्तीमुळे अनेक प्रवासीदेखील अशा घटनांचे व्हिडिओ, किस्से सोशल मीडियावर शेअर करतात. या विमानातला आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. यात एक महिला प्रवासी चक्क विमानातच आपली अंतर्वस्त्रे सुकवताना दिसत आहे. Ural Airlines च्या विमानातला हा व्हिडिओ असल्याचं समजत आहे.

या व्हिडिओत महिला ओव्हरहेड एअर व्हेंटवर अंतर्वस्त्रे सुकवत होती एका प्रवाशानं याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर शेअर केला. हे विमान तुर्कीतून रशियाची राजधानी मॉस्कोला जात होते. एक रशियन वेबसाईटनं हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. ही महिला कदाचित लहान मुलाचं अंतर्वस्त्रे सुकवत असल्याचं म्हटलं जातं आहे. ही महिला कोण होती हे मात्र समजू शकलं नाही पण, अनेकांना विमानात अंतर्वस्त्रे सुकवण्याची ही डेकॉलिटी पाहून हसू अनावर होत होतं.