काही दिवसांपूर्वी बेल्जिअममध्ये बिअरची पाईपलाईन टाकली होती. क्वचितच एखाद्या देशात बिअरची पाईपलाईन टाकली असेल. पण आता इटलीमध्येही असाच काहिसा प्रयोग करण्यात आला आहे. इटलीमधील अब्रुझो प्रांतात येथल्या एका स्थानिक विनयार्डने पुढाकार घेऊन वाइनचे कारंजे उभारले आहे. या कारंजामधील वाइन प्रेमींना रेड वाइनचा आनंद घेता येणार आहे. कोणीही अगदी फुकटात हवी तेवढी वाइन येथे पिऊ शकतो. विशेष म्हणजे रेड वाइनचा हा कारंजा २४ तास सुरू राहणार आहे. हे कारंजे ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहे तिथून एक रस्ता हा इटलीच्या प्रसिद्ध अशा चर्चकडे जातो. तेव्हा या रस्त्यावर पर्यटकांचा राबता पाहता त्यांना खुश करण्यासाठी येथील स्थानिक विनयार्डने हे कारंजे बांधले आहे.

वाचा  : या देशाने चक्क बिअरची पाईपलाईन टाकली

economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

रेड वाइन पिणा-या देशांमध्ये इटली हा देश पहिल्या दहामध्ये येतो. इटलीमधील रेड वाइन संबधित एक किस्साही खूप प्रसिद्ध आहे. २००८ मध्ये येथल्या ग्रेप वाईन फेस्टीव्हल दरम्यान पाईप लाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाण्याच्या पाईप लाईनमधून चुकून वाईन घराघरात पोहचली होती. येथे दरवर्षी ग्रेप वाईन फेस्टीव्हल भरतो. यादरम्यान येथील काही कारंज्यांमधून पाण्याऐवजी वाईनचे कारंजे निघातात. महिन्याभरापूर्वी बेल्जिअम देशात ‘दी हाल्वे मान’ या बिअर उत्पादक कंपनीने ब्रुग्स गावत बिअरची पाईपलाईन टाकली. ४ किलोमीटर लांब असलेल्या या पाईपलाईनमधून दिवसाला ४ हजार लीटर बिअर वाहून नेली जाते.