22 February 2020

News Flash

संसदेत घुसला कोल्हा

सुरक्षारक्षकांची नजर चुकवून संसदेत घुसला कोल्हा

माणसांच्या वस्तीत वाघ, बिबटे, साप वगैरे प्राणी घुसल्याचे आपण अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल. परंतु चक्क संसदेत कोल्हा शिरल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? वरकरणी ही बाब अगदी गंमतीशीर किंवा अफवा वगैरे वाटत असली, तरी ही सत्य घटना आहे. ही आश्चर्यचकित करणारी घटना ब्रिटीश संसदेत घडली आहे. शेकडो सुरक्षारक्षकांची नजर चुकवून एक कोल्हा संसदेत घुसला.

अवश्य वाचा – नेहा कक्कर संतापली; भावाच्या लगावली कानशीलात

अवश्य पाहा – ‘या’ श्रीमंत अभिनेत्रीसमोर शाहरुख खानही वाटतो गरीब

अवश्य पाहा – जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

कोल्हा संसदेत कसा घुसला?

संसदेच्या मुख्य इमारतीभोवती एका उंच भितींचे कडे आहे. या भिंतीभोवती २४ तास शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकांचा जागता पाहारा असतो. शिवाय सीसीटीव्ही आणि लेझर यंत्रणा त्यांच्या मदतीला असतात. मात्र हा कोल्हा गुरुवारी रात्री चक्क भिंतीवर चढून आत घुसला. आश्चर्याची बाब म्हणजे आता भितीवरुन आत उडी मारताना त्याला कोणीच पाहिले नाही. त्यानंतर सुरक्षारक्षकांची नजर चुकवून तो थेट संसदेच्या कँटिनमध्ये शिरला. बहुदा अन्नाच्या शोधात तो तेथे गेला असावा. परंतु अचानक आलेला कोल्हा पाहून एकच गोंधळ माजला, लोक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर सुरक्षाअलार्म वाजला आणि शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांनी त्या कोल्ह्याला पकडले.

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. इतकी मोठी भिंत तो वर चढलाच कसा. शिवाय कँटिंनच्या आत शिरेपर्यंत तो कोणाला दिसला कसा नाही. त्यावेळी कामावर हजर असलेले सुरक्षा रक्षक काय करत होते? अशा सर्व प्रश्नांची चौकशी सध्या सुरु आहे.

First Published on February 13, 2020 4:00 pm

Web Title: a fox sneaked into the british parliament mppg 94
Next Stories
1 Once Upon a Time in Rajasthan : पाहा, आयपीएलच्या संघांचा फिल्मी अंदाज
2 “तू गोलंदाजी करत असशील तर नक्की”, डॅनियलकडून युजवेंद्र चहलची बोलंती बंद
3 Video: एक विमान टेकऑफच्या तयारीत असताना दुसरे लॅण्डिंगसाठी उतरु लागले अन्…