News Flash

VIRAL VIDEO : धावत्या ट्रेनसमोर सेल्फीचा नाद तरुणाला भोवला!

हैदराबादमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला ट्रेनची जबरदस्त धडक बसली असून यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

सेल्फीच्या नादापायी जीव गमावणारे शेकडो लोक आपण पाहिले आहेत, सेल्फी घेण्यात काहीच गैर नाही पण आपण तो कुठे घेत आहोत, त्यासाठी आपण आपला जीव तर धोक्यात घालत नाही आहोत ना हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे, कारण हा सेल्फीचा नाद कधीही एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ. धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला ट्रेनची जबरदस्त धडक बसली असून यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

हा व्हिडिओ हैदराबादमधला असून संबधित तरुणाचं नाव शिव असल्याचे समजत आहे. काही स्थानिक वृत्तवाहिनींच्या माहितीनुसार ही घटना तीन दिवसांपूर्वी हैदराबादमधल्या भरतनगर स्थानकावर घडली. हा तरुण धावत्या ट्रेन समोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. तो रेल्वेरुळाच्या अगदी बाजूला होता, या तरुणाला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यापासून त्याच्या मित्रानं रोखलंदेखील पण, या तरुणानं त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे सेल्फीच्या नादापायी मागून वेगानं येणाऱ्या ट्रेनची धडक त्या तरूणाला बसली. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्येही असाच प्रकार घडला होता. चार कॉलेजमधील विद्यार्थिनींनी धावात्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातल्या एकीला ट्रेनची जबरदस्त धडक बसली होती. सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकताच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार सेल्फीच्या नादात जीव गमावणाऱ्यांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर होत चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:36 pm

Web Title: a hyderabad boy suffered serious injuries after he was hit by a train while shooting a selfie video
Next Stories
1 रस्त्यावर शौचास बसलेल्या व्यक्तीसोबत नगरसेवकाचा सेल्फी
2 Video : फोनची बॅटरी तरुणाच्या तोंडात फुटली
3 Video : काश्मिरी तरुणाचा जीवावर बेतणारा स्टंट व्हायरल
Just Now!
X