18 October 2019

News Flash

मर्डर ट्रायलमधलं सेक्सी संभाषण ऐकून खुद्द न्यायाधीशही चळले

या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध केला जात आहे

Carlisle Greaves

न्यायालयाचे कामकाज हे चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे चालत नाही. चित्रपटांमध्ये केला जाणारा आरडाओरड वगैरे न्यायाधीश खपवून घेत नाहीत. न्यायलयामध्ये आरोपी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देताना घटनाक्रम सविस्तर उलगडून सांगताना अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेकदा ते अगदी रंगवून एखादा गुन्ह्याच्या घटनाक्रम सांगतात. मात्र बर्म्युडामधील एका न्यायाधिशांनी एका खुनाच्या खटल्यातील लैंगिक अत्याचारांचे वर्णन ऐकत असताना आपला तोल सुटल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

कार्लिले ग्रीव्हस असे या न्यायाधिशांचे नाव असून ते बर्म्युडामधील न्यायलयामध्ये कनिष्ठ न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. मागील महिन्यामध्ये एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदार साक्ष देत असतानाच ग्रीव्हस यांनी जुन्या खटल्यातील आठवण सांगताना धक्कादायक वक्तव्य केले.

ग्रीव्हस यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध केला जात आहे. इंग्लंडमधील कोर्ट ऑफ अपीलकडून ग्रीव्हस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. न्यायाधीश सर म्युराइस की यांनी एखाद्या न्यायाधिशांने अशाप्रकारचे हीन दर्जाचे वक्तव्य करणे निंदनीय असल्याचे म्हटले आहे. ‘सेक्सी संभाषण ऐकून माझा तोल गेला, असे ग्रीव्हस यांनी केलेले वक्तव्य म्हणजे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारे आहे. ते न्यायाधीश नक्की कोणत्या अहवालाबद्दल बोलत होते याचा या वक्तव्याशी काहीही संबंध नसून त्यांनी केलेले वक्तव्य हे धक्कादायक आहे. न्यायनिवाडा करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे,’ असं म्युराइस म्हणाले.

ग्रीव्हस यांनी २०११ मधील एका प्रकरणाचा संदर्भ देत ‘ती सुनावणी सुरु असताना त्यामध्ये लैंगिक अत्याचाराबद्दल अनेकदा बोलले गेल्याने माझाचा तोल ढासळला होता,’ असे वक्तव्य केले होते.

First Published on September 18, 2019 12:49 pm

Web Title: a judge got horny while hearing a murder trail as it had sex talk scsg 91