News Flash

“तुम मुझे छोड के पूजा से बात करने लगे….”, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर रंगल्या लव्ह बर्ड्सच्या गप्पा

या तरुणाचं ट्विट सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

देशातला करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. काही राज्यांमधला लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. बिहारमधला लॉकडाउनही आता वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. त्यांच्या या ट्विटवर एका तरुणाने केलेली कमेंट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नितीश कुमार यांच्या या ट्विटवर पंकज कुमार गुप्ता नावाच्या तरुणाने कमेंट करत चक्क लग्नांवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सर, जर तुम्ही लग्नांवर बंदी घातली असती, तर माझ्या प्रेयसीचं १९ मेला होणारं लग्नही थांबलं असतं. आम्ही जन्मभर तुमचे ऋणी राहू.”

आणि याहूनही भन्नाट गोष्ट म्हणजे पंकजच्या ट्विटला नव्या कुमारी नावाच्या एका तरुणीने उत्तर दिलेलं आहे. ती म्हणते, “जेव्हा तू मला सोडून गेलास आणि पूजाशी बोलायला लागलास, त्यावेळी मी खूप रडले. आज मी आनंदाने लग्न करत आहे. त्यामुळे मी तुला विनंती करते की तू हे सगळं करणं बंद कर. माझं लग्न कोणाशीही होऊ दे, पण तू कायम माझ्या मनात राहशील. माझ्या लग्नाला नक्की ये.”

या दोन्ही ट्विटवर सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन्ही ट्विट्स वेगाने व्हायरल होत आहेत. तर बिहारमधली करोनाची स्थिती लक्षात घेता तिथला लॉकडाउन १६ मे पासून २५ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:18 pm

Web Title: a man asks to cancel the weddings during lockdown tweeted to bihar chief minister nitish kumar vsk 98
Next Stories
1 …आणि भाजपा खासदाराने स्वत: घासून साफ केलं करोना केंद्रामधील शौचालय
2 नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा; म्हणाले, “आज मला महिन्याला…”
3 Coronavirus: मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या”; व्हिडीओ झाला व्हायरल
Just Now!
X