28 October 2020

News Flash

फावल्या वेळेत टोल फ्री क्रमांकावर लावला फोन अन् गेला तुरुंगात

बुधवारी सकाळी त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

जापानमधील एका व्यक्तीला टोल फ्री नंबरवरुन फोन करणे चांगलेच महागात पडलेय. सातत्याने टोल फ्री नंबरवर फोन केल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कितोशी ओकामोटो असे असून ते ७१ वर्षांचे आहेत. बुधवारी सकाळी त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

काय आहे प्रकरण ?

टोकियो येथे राहणाऱ्या ७१ वर्षीय कितोशी ओकामोटो यांची मुले परदेशात राहतात. कुटुंबातील एकही व्यक्ती जवळ नसल्यामुळे ते एकाकी पडले. परिणामी वेळ घालण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली. एकाकी असलेल्या कितोशी यांनी थेट जापनीस दूरसंचार कार्यालयाला टोल फ्री क्रमांकावरून फोन करण्यास सुरुवात केली. ते फोन करुन कोणत्याही प्रश्नावर तेथील टेलिफोन ऑपरेटरशी वाद घालायचे. कितोशी यांनी मार्च २०१७ पासून डिसेंबर २०१९ पर्यंत दोन वर्षात वर्षात तब्बल २४ हजार फोन केले. एकाच क्रमांकावरुन सतत येणारे फोन पाहून ऑपरेटरने कितोशींची कंपनीतील उच्च आधिकाऱ्याकडे तक्रार केली. कंपनीनं सर्व फोन रेकॉर्ड तपासून कितोशी यांच्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीला सातत्याने फोन केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अखेर बुधवारी कितोशी यांना ताब्यात घेतलं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 7:15 pm

Web Title: a man called a telecom company 24000 times to complain now hes been arrested mppg 94
Next Stories
1 Jio vs Airtel vs Vodafone: कोणाचे टॅरिफ प्लॅन्स आहेत बेस्ट ?
2 आता आला Nokia चा ‘4K स्मार्ट टीव्ही’ , लाँचिंगलाच दिली डिस्काउंट ऑफर
3 इंग्रजांनी बंदिवान बनवलेलं झाडं १२१ वर्षांपासून साखळदंडात!
Just Now!
X