सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून अनेकांना स्वत:ची आठवण झाली असेल. सध्या प्रत्येकाची हिची परिस्थीती आहे. आठ साडे आठ तासांची शिफ्ट ही तर अनेकांसाठी फक्त कल्पनाच बनून राहिली आहे. कधी दिवस उजाडतो आणि कधी संपतो काहीच कळत नाही. त्यातून अनेकांनी तर आता ऑफिसला घरच बनवले आहे. हा बॉस कधी काय सांगेल याचा नेम नाही, तेव्हा नोकरी टिकवायची असेल तर असे काही ना काही ‘जुगाड’ करावे लागतातच ना! आणि आपल्यासाठी हा शब्द काही नवा नाही याबाबतीत तर आपला हातखंड. नाही का?

व्हिडिओ: …आणि सेरेना विल्यम्सने त्या दोघांची व्यवस्थित खेचली!

म्हणूनच रस्त्याच्या कडेला लॅपटॉप उघडून काम करणा-या फोटोमधला हा बिचारा कर्मचारी अनेकांना आपल्या जवळचा वाटत असेल. हल्ली लोक इतके वर्कोहॉलिक झाले आहेत की कॉफी शॉप, हॉटेल किंवा अगदी बाग जिथे जागा मिळेल तिथे लॅपटॉप उघडून कामात गुंग झालेले दिसतात. असे चित्र आपल्याला काही नवे नाही पण यापुढे चक्क फुटपाथवर मांडी घालून लॅपटॉवर काम करताना कोणी आढळला तर आश्चर्य वाटून घेऊ नका! कारण हल्ली फास्ट अँड फ्युरिअस लाईफस्टाईल जगणा-या कोणावरही अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे असे प्रकार चालायचेच. शेवटी काय पोटापाण्याच्या प्रश्न आहे, इतना तो करना पडता हे ना यार! बाकी हा कमनशीबी कोण, त्याचा आता पत्ता काय हे मात्र नेटीझन्सना विचारण्याच्या फंद्यात पडू नका.