News Flash

अजब! चीनमध्ये पुलाखाली अडकलं विमान, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

व्हिडीओ नेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे

विमान एखाद्या पुलावर उतरवण्यात आल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण हेच विमान पुलाखाली अडकल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? नक्कीच नसेल. पण चीनमध्ये ही अजब घटना घडली आहे. चीनमध्ये विमान चक्क पुलाखाली अडकलं असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे विमान पुलाखालून काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी शेअर करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पण हे विमान उड्डाण करताना किंवा लँण्डिंग करताना पुलाखाली अडकलेलं नाही. तर हे विमान एका ट्रेलरवरुन नेलं जात असताना पुलाखाली अडकलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओत तुम्ही विमान पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. तसंच चालक हे विमान कसं बाहेर काढता येईल यासाठी मार्ग शोधत असल्याचंही दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचे भाग वेगळे केल्यानंतर नेले जात होते. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या हास्यास्पद परिस्थितीतून सुटका करुन घेण्यासाठी चालकाला ट्रेलरच्या टायरमधील सर्व हवा काढावी लागली. या ट्रेलरची चाकं उंच असल्या कारणाने विमानाला पुलाखालून सुरक्षित काढण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. चालकाने लढवलेली ही शक्कल कामी आली आणि विमान पुलाखालून बाहेर काढण्यात आले. यानंतर पुन्हा चाकांमध्ये हवा भरुन ट्रेलर रवाना करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 2:54 pm

Web Title: a plane got stuck below bridge in china sgy 87
Next Stories
1 गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बायकोला घरात कुलूप लावून केलं बंद
2 मतदानावेळी तेंडुलकरला पाहून क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरने केलं ‘हे’ कृत्य
3 64MP कॅमेरा! पहिल्या सेलमध्ये काही सेकंदातच Out Of Stock, ‘रेडमी नोट 8 प्रो’साठी पुन्हा सेल
Just Now!
X