करोना विषाणूचा जगभरात मोठा उद्रेक झालेला असताना देशातही याचा प्रभाव वाढतच आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू नका, असा सल्ला एका सामाजिक कार्यकर्त्याने डोक्यावर करोना विषाणूच्या थीमचे हेल्मेट घालून दिला होता. आता कोलकत्यामध्ये करोना मिठाई आली आहे.

कोलकाता मधील एका मिठाईच्या दुकानाच्या मालकांनी करोना मिठाई तयार केली आहे. या मिठीईच्या खास रूपाबाबत सांगताना ते म्हणाले की, “आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण असणार, ही भीती दूर करण्यासाठी आणि लोकांना आधार देण्यासाठी करोना मिठाई साकारण्यात आली आहे. या मिठाईमार्फत ‘आपण कोरोनाला पचवू शकतो, तो आपल्याला नाही’ असा संदेश लोकांपर्यंत पोहचवायचा आहे.” एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे. करोना मिठाईचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

छत्तीसगढमध्ये एका दांपत्याने आपल्या जुळ्या मुलांचे नाव कोव्हिड आणि कोरोना असे ठेवले होते. या सर्व प्रसंगातून भारतीय आणि त्यांची क्रिएटिव्हिटी ही अफाट असल्याचे दिसून येतेय.

आणखी वाचा  : Coronavirus: जनजागृतीसाठी ‘त्यानं’ घातलं करोना हेल्मेट; घरातच राहण्याचं केलं आवाहन