पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योगप्रेम सर्वश्रूत आहे, ते नेहमीच इतरांना योग करण्यासाठी प्रेरीत करत असतात. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी योगामुळे चर्चेत आले आहेत. पण यावेळी कारण जरा वेगळं आहे.

भाजपाच्या एका नेत्याने मोदींचा योगसाधना करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींचा नाहीये, तर दुसऱ्याच कोणाचा तरी आहे. पण, भाजपाच्या काही नेत्यांनी आणि अनेक युजर्सनीही हा व्हिडिओ मोदींचा समजून शेअर केलाय. मात्र, ‘द प्रिंट’च्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ भलताच कोणाचातरी असल्याचं समोर आलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपा नेते मनोज गोयल यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. पण हा व्हिडिओ फेक असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोयल यांनी हा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ काळातील व्हिडिओ शेअर करुन, ‘योग करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुर्मिळ व्हिडिओ’ असं म्हटलं. पण फॅक्ट चेकमध्ये व्हिडिओत दिसणारी व्यक्ती मोदी नसून प्रसिद्ध योगगुरू आणि अयंगर योगाचे संस्थापक बीकेएस अयंगर (BKS Iyengar) असल्याचं स्पष्ट झालंय. हा व्हिडिओ 2006 मध्ये युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून 1938 मध्ये व्हिडिओ शूट करण्यात आला होता. ओरिजनल व्हिडिओमध्ये अयंगर यांचे गुरू तिरुमलाई कृष्णमाचार्य हे देखील आहेत. पण, तो भाग व्हायरल व्हिडिओमधून हटवण्यात आला आहे.