News Flash

Video : तिनं मृत्यूला दोनदा दिली हुलकावणी

हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतं

रस्त्यावर असणाऱ्या बघ्यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं.

चीनमध्ये नऊ मजल्यांच्या इमारतीवरून दोनदा पडूनही एक महिला सुखरूप बचावली. ही महिला हॉटेलमध्ये राहायला आली असल्याचं समजते. हॉटेलच्या गच्चीवरून ती खाली पडली पण, सुदैवानं ती रस्त्यावर न पडता दुसऱ्या मजल्यावर पडली. तो प्रकार रस्त्यावरच्या लोकांनी पाहिला आणि हॉटेलच्या गेटवर बघ्यांची गर्दी जमली. ही महिला उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला आणि दुसऱ्या मजल्यावरून ती पुन्हा खाली कोसळली. सुदैवानं बिल्डिंगच्या खाली जमलेल्या बघ्यांनी या महिलेला झेललं. या महिलेनं आत्महत्या केली की, ती कोसळली हे समजू शकलं नाही.

रस्त्यावर असणाऱ्या बघ्यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं. मृत्यूला हुलकावणी देऊन ती वाचली खरी पण, यात ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 5:16 pm

Web Title: a woman suffered a terrifying fall from the 9th floor of a multi storey hotel in china
Next Stories
1 ही निळ्या डोळ्यांची ‘बाहुली’ सोशल मीडियावरची नवी स्टार
2 YouTube Rewind 2017 : यूट्युबच्या या यादीत ढिंच्याक पूजाचा बोलबाला
3 Video: पांड्या-धोनीमध्ये शर्यत, पाहा कोण जिंकलं
Just Now!
X