08 March 2021

News Flash

“…अन् भाजपा काँग्रेसला म्हणते, ‘हे’ मी करते तोपर्यंत तुम्ही Dream11 वर टीम बनवा”

ड्रीम इलेव्हनची जाहिरात सध्या चर्चेत असून आता त्यावरुन लगावण्यात आलाय राजकीय टोला

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : पीटीआय)

सध्या सगळीकडे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची चर्चा आहे. दरवर्षीप्रमाणे ही मालिका काही मोजक्या संघांच्या दमदार कामगिरीऐवजी समतोल कामगिरीमुळे चर्चेत आहे. म्हणजे प्ले ऑफ्सला अद्याप बराच वेळ असला तरी अव्वल चार संघ कोण हे जवळजवळ अर्धी मालिका संपल्यानंतरही निश्चितपणे सांगता येणार नाही अशी गुणतालिकेतील स्थिती आहे. मात्र खेळाबरोबरच अजून एक गोष्ट सध्या चर्चेत आहे ती म्हणजे यंदाच्या आयपीएलचे मुख्य प्रायोजक असणाऱ्या ड्रीम इलेव्हनची जाहिरात. या जाहिरातीवरुन सध्या मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. मिम्सच्या या प्रवाहामध्ये आम आदमी पार्टीनेही प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना हटके पद्धतीने टोला लगावला आहे. सध्या आम आदमी पार्टीची ही ड्रीम टीका सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की वाचा >> ‘गळती’ से मिस्टेक… प्रसाद लाड यांचे हिंदी पाहून नेटकरी म्हणाले, ‘हिंदीसाठी ही पावती फाडायला हवी होती’

काय आहे ड्रीम इलेव्हनची जाहिरात?

भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेल्याने यंदा आयपीएलचे मुख्य प्रायोजक असणाऱ्या व्हिवोने प्रायोजकत्व काढून घेतलं. त्यानंतर आयपीएलसाठी ड्रीम इलेव्हन या कंपनीने मुख्य प्रायोजकत्व दिलं. मोबाईलव अ‍ॅप्लिकेशनच्या  माध्यमातून सर्वोत्तम संघ निवडायचा आणि युझर्सने निवडलेल्या संघातील खेळाडूने चांगली कामगिरी केल्यास त्याचा मोबदला युझर्सला मिळणार या तत्वावर ड्रीम इलेव्हन काम करतं. याच अ‍ॅपची जाहिरात सध्या आयपीएल दरम्यान दाखवण्यात येत आहे. बसचा प्रवास, बेडवरील लोळणं, टेबलवर बसून टाइमपास करणं अशी रोजची काम करणाऱ्या सामान्य व्याक्तींना तुम्ही ड्रीम इलेव्हनवर टीम बनवा मी हे करतो असं काही लोकप्रिय खेळाडू सांगताना या जाहिरातींमधून दिसून येत आहे. वेगवेगळ्या थीमवर आधारित जाहिरातींमध्ये अगदी महेंद्र सिंग धोनी, शिखर धवन, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दीक पांड्या, जसप्रित बुमराहसारखे लोकप्रिय खेळाडू दिसून येत आहे. याच थीमपैकी “तुम्ही ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करा मी अमूक तमूक करतो..” हे सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे. यावरुन अनेक मिम्सही तयार केले जात आहेत.

आपचा टोला

ड्रीम इलेव्हनसंदर्भातील याच ट्रेण्डमध्ये आपने उडी घेतली असून त्यांनी भाजपा आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “काँग्रेस देशाला लुटत होती. त्यावेळी भाजपा तिथे आला अन् म्हणाला, हे मी करतो तोपर्यंत तुम्ही ड्रीम ११ वर टीम बनवा’, असं ट्विट आपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केलं आहे.

१३ ऑक्टोबर रोजी केलेल्या या ट्विटला पाच हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं असून १८ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 9:53 am

Web Title: aap tweets about dream 11 hits out congress and bjp scsg 91
Next Stories
1 घराच्या मुख्य दरवाजावर चढत होती मगर अन् मांजर मात्र…; एक लाखांहून अधिक शेअर झालाय ‘हा’ फोटो
2 Viral Video: मुंबईत इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा हॅण्डस्टँड, पोलीस घेतायत तरुणाचा शोध
3 बापरे…! डोळ्यावर पट्टी बांधून नारळ फोडण्याचा विक्रम पाहिल्यावर तुम्हीही व्हाल थक्क
Just Now!
X