22 July 2019

News Flash

Video : त्या श्वानाला अखेर मिळालं हक्काचं घर

निदर्यी मालकानं त्याला रस्त्यात सोडून पळ काढला होता

इंग्लडमधला हा व्हिडीओ ख्रिस्मसच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. त्याच्या निदर्यी मालकानं त्याला रस्त्यात सोडून पळ काढला होता. रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा प्रकार कैद झाला होता. त्यानंतर एका प्राणीप्रेमी संस्थेनं या श्वानाचा संभाळ केला होता. अखेर या श्वानाला त्याची काळजी घेणारा नवा मालक आणि हक्काचं घर मिळालं आहे.

इंग्लडमधला हा व्हिडीओ ख्रिस्मसच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाळीव कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्यानं या मालकानं त्याला रस्त्यावर आणले. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्यानं कुत्र्याचा बेड रस्त्याच्या कडेला टाकला, कुत्र्यालाही तिथेच सोडलं आणि पळ काढला. मालकाचं हे वागणं पाहून गोंधळून गेलेल्या कुत्र्यानं मालकाकडे परत जाण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या या निदर्यी माणसानं कुत्र्याला गाडीत घेतलं नाही. मालकाकडे जाण्याची त्याची केवीलवाणी धडपड अत्यंत हृदयद्रावक होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका प्राणीप्रेमी संस्थेनं त्याची काळजी घेतली होती.

स्नूपचा नवा मालक

या श्वानाला दत्तक घेण्यासाठी शेकडो लोकांनी अर्ज केले होते. यात प्रसिद्ध रॅपर स्नूप डॉगचाही समावेश होता. मात्र त्याची काळजी घेणारं त्याचा सांभाळ करणाऱ्या योग्य मालकाच्या शोधात संस्था होती. अखेर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना या श्वानासाठी योग्य असा मालक मिळाला आहे. आता स्नूप या नवा मालकासोबत राहत आहे, मात्र या श्वानाला रस्त्यात सोडून देणाऱ्या त्या निदर्यी मालकाचा शोध घेणंही संस्थेनं सुरू ठेवलं आहे.

First Published on March 13, 2019 10:22 am

Web Title: abandoned dog finds forever new home