आगामी काळात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून आता राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

“आमच्या सरकारला हवे आहे : एक सर्वसमावेशक अफगाणिस्तान. त्यांच्या “अब्बा जान” टिप्पणीसह योगींना काय हवे आहे: एक सर्वसमावेशक यूपी किंवा विभाजित करा आणि राज्य करा?” असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं आहे.

आता या वरूनच ट्विटरवर नेटकरी #AbbaJaan हा हॅशटॅग चालवत आहेत. या हॅशटॅगसह असंख्य पोस्ट ट्विटरवर केल्या जात आहेत. यामुळे हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया