आपल्याला मदत करणा-यांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी हे मूल्य आपण नेहमीच पाळतो. पण हा कृतज्ञपणा एका कांगारूच्या अंगी तुम्ही क्वचितच पाहिला असेल. आपल्याला जीवनदान देणा-या मालकीणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मादा कांगारू रोज सकाळी न चुकता तिला आलिंगन देते.

VIRAL VIDEO : सापाने चक्क अजगराला गिळले

आका अबी ही मादा कांगारू अॅलिस स्प्रिंग या कांगारू अभयारण्यात राहते. या ठिकाणची राणी म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. ती पाच महिन्यांची असताना तिला जखमी अवस्थेत येथे आणण्यात आले. या ठिकाणी जखमी आणि आजारी असलेल्या कांगारूवर उपचार केले जातात. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली की त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते. अबी ही त्यापैकी एक होय. सध्या ती नऊ वर्षांची आहे. तिला जेव्हा येथे आणण्यात आले तेव्हा तिची प्रकृती तशी गंभीरच होती. पण येथील डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार करून तिला वाचवले. तेव्हापासून आपल्याला जीवनदान देणा-या महिला कर्मचा-यांना ती न चुकता आलिंगन देते. आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही पण आलिंगन देऊन नक्कीच कृतज्ञता व्यक्त करु शकते हे तिला चांगले कळले. या अभयारण्याच्या फेसबुक पेजवर फार पूर्वी तिच्याबद्दल माहिती टाकण्यात आली होती.

वाचा : लॉटरी जिंका आणि कोंबडी, मासे, बदक मिळवा!