अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणुक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे नेहमीच वादग्रस्त विधान करत कात्रीत सापडल्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोदींची री ओढायला सुरूवात केली आहे. अमेरिकेत असणा-या भारतीयांना आपल्या बाजूने वळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली भाषणे नेहमीच चर्चेत राहिली आहेत. अशात ट्रम्प यांनी मोदींचा २०१४ निवडणुक प्रचार सभेचा नारा उचलला आहे. ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असा नारा देणा-या ट्रम्प यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खरा की खोटा याची सत्यता मात्र तपासली नाही पण इंटरनेटवर मात्र तो चांगलाच व्हायरल होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी अमेरिकेतील भारतीय जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुढे ‘अबकी बार ट्रम्प सरकारचा नारा देतानाही ते दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी भारताचे कौतुक केले होते. भारतीय जनतेने अमेरिकेच्या आणि जगाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिल्याचे ट्रम्प यांनी वक्तव्य केले होते. न्यूजर्सी मधल्या एका कार्यक्रमात तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची जाहिर स्तुती देखील केली होती.

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….