पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नहयान हे भारत दौऱ्यावर आले. भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त युवराज प्रमुख अतिथी होते. यावेळी भारत आणि युएईमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांची देवाण घेवाण झाले. या युवराजांविषयी अनेकांना उत्सुकता असेल. शेख जायेद बिन सुल्तान अल नहयानचे ते तिसरे पुत्र आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नावे एक विश्वविक्रम देखील आहे तो म्हणजे जगातील सर्वात खर्चिक लग्नसोहळ्याचा विश्वविक्रम.

वाचा : होऊ दे खर्च ! ५०० कोटींचा शाही विवाहसोहळा

१९८१ मध्ये मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचा विवाह सोहळा पार पडला. युवराज्ञी सलमा बिंत हमदान हिच्याशी ते विवाहबंधनात अडकले होते. सात दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात २० हजार व-हाडी मंडळींना बसण्यासाठी चक्क स्टेडियमच बनवण्याचे आदेश दिले होते. आता शाही घराण्यातला विवाह सोहळा होणार म्हणजे तो महागडा असणारच. यावेळी आपल्या जनतेला त्यांनी भेटवस्तू देखील दिल्या होत्या. या विवाह सोहळ्याची आणखी एक कथा ऐकिवात आहे ती म्हणजे युवराजांच्या पत्नीला अक्षरश: सोन्याने मढवली होती. त्यांनी आपल्या माहेरून २० उंटावर सोने लादून आणले होते अशीही चर्चा होती. या लग्नात ६ अब्ज खर्च करण्यात आले होते म्हणूनच त्यांचे लग्न जगातील सगळ्यात खर्चिक आणि महागडे लग्न ठरले होते. हा विक्रम अद्यापही कोणी मोडला नाही.

वाचा : सावधान! ‘रिलायन्स जिओ’च्या नावे आलेला संदेश तुम्हाला अडचणीत आणू शकतो