सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. काही वेळा काही फायदेशीर माहिती देण्याऱ्या गोष्टींबद्दल व्हिडीओही व्हायरल होतात. आता एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल . व्हिडीओमध्ये, एका घराशेजारी रिकाम्या प्लॉटमध्ये बांधकाम सुरू होते, त्या दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ जरूर पाहा.

काय आहे प्रकरण

व्हिडीओमध्ये, घराच्या शेजारी एक रिकामा प्लॉट पडलेला आहे. ज्यामध्ये बांधकाम सुरू आहे. बांधकामादरम्यान, प्लॉटची तोडफोड आणि उत्खनन करण्यात आले, ज्यामुळे बाजूला असलेलेल तीन मजली घर काही सेकंदात पत्त्यांसारखं कोसळलं. या घराच्या बरोबरीच्या बाजूच्या भूखंडामध्ये पायासाठी उत्खनन करण्यात आले. तथापि, काही वेळातच हे माहित झाले की यामुळे, तीन मजली घराचा पाया खराब झाला आहे आणि तो हळूहळू कोसळू लागला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

व्हिडीओ झाला व्हायरल

घर पडल्याचे पाहून लोक त्या तीन मजली घरातून बाहेर आले. यासह जवळपासची दुकानेही रिकामी करण्यात आली. या घटनेत कोणत्याही मानवी हानी झाली नाही परंतु घरात काहीही शिल्लक नव्हते. घर कोसळल्याचा व्हिडिओ तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला होता, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर giedde या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले “जर तुमच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ रिकामा प्लॉट असेल आणि ज्यामध्ये उत्खननाचे काम चालू असेल तर त्या कामाला विरोध करणे किंवा थांबवणे हा तुमचा अधिकार आहे. यामुळे तुमच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते.” आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर ४ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. लोक या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?