मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे ती ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शिर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमुळे. तशीही हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे तिची मतं सोशल नेटवर्किंगवर मांडताना दिसते. नेटकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, अगदी स्त्री पुरुष समानतेपासून ते ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यापर्यंत सारं काही हेमांगी प्रो स्टाइलने करते.नुकताच तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे तिच्यावर ट्रोलधाड पडली तर तिने स्त्रीयांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असून तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र अशाप्रकारे हेमांगीने न बोलल्या जाणाऱ्या विषयावर बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय यापूर्वीही तिने सार्वजनिक ठिकाणी पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयाचा वापर करण्यावरुन लिहिलेली पोस्ट चांगलीच गाजली होती.

सध्या व्हायरल झालेल्या हेमांगीच्या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. मात्र यापूर्वी १० ऑक्टोबर २०२० रोजी तिने पाश्चमात्य पद्धतीची शौचालये वापरताना पुरुष कशापद्धतीने बेजबाबदार वर्तन करतात यावरुन परखड मत व्यक्त केलेलं.

हेमांगीने कोणते प्रश्न उपस्थित केलेले?

“हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट (कमोड) असतात. त्यात काही कॉमन टॉयलेट म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकचटॉयलेट असतं. अशावेळी ते टॉयलेट कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहान वयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं,” असं म्हणत हेमांगीने आपलं मत एका पोस्टमधून मांडलं होतं. तसेच हा अत्यंत गरजेचा विषय असल्याचंही तिने म्हटलं होतं.

नक्की पाहा >> Photos: ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ ते ‘विनोदाची डबल डेक्कर’ सारेच पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

पुरुष मूत्र विसर्जन करताना ‘कमोड’च्या रिंगवर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अशा घाणेरड्या ‘कमोड’वर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा मॅनेज करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळीच्या (पिरेड्सच्या) वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का?,” असे प्रश्न तिने उपस्थित केलेले.

पुरुषांना कमोड कसं वापरावं हे कळतं तरी…

तसेच पुढे लिहिताना तिने या गोष्टींचा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. “याचा विचार होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! ‘कमोड’ कसं वापरावं हे कळतं, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही हायजीन (स्वच्छता), हेल्थशी (आरोग्याशी) असतो. सगळ्यांनी या विषयी ओपनली बोलावं! कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर फ्लशही ही करत नाहीत. अरे काय? एक बटण दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं,” असं म्हणत हेमांगीने कॉमन टॉयलेट बेजबाबदारपणे वापरणाऱ्या व्यक्तींवर टीका केलेली.

नक्की वाचा >> ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडेचं न्यूड फोटोशूट; फोटो पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

हेमांगीने कमोड वापरण्याची आदर्श पद्धतही सांगितली…

“‘कमोड’, वेस्टर्न टॉयलेट आणि युरोपियन टॉयलेट कसे वापरावेत याची आपल्याला गुगलवर माहिती मिळवता येईल. पण आपल्याला साधं फ्लश बटणही पुश करता येत नसल्याचा आळस बघता इथे मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे,” असं म्हणत हेमांगीने टॉयलेट कसं वापरावं हे सुद्धा पुढे सांगितलं आहे. “पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना ‘कमोड’ची रिंग (फ्रेम) वर करून आपला कार्यभाग उरकून फ्लश करून झाल्यावर पुन्हा ती फ्रेम टॉयलेट सीटवर पाडायची असते. ‘कमोड’ सीट स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं. व्यवस्थित प्लश झालंय की नाही ते पहावं जेणे करुन दुर्गंधी येऊन जीव गुदमरुन जाऊ नये याची खात्री करुन मगच बाहेर पडावं,” असं हेमांगीने पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसेच पुढे, “काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही असा भलताच पुरूषी अहंकार गाजवतात त्यांना कोपऱ्यापासून दंडवत,” म्हणत तिने टोलाही लगावलाय.

नक्की वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून शब्बासकी; म्हणाले…

प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनोसोक्त’ हलकं व्हावंसं वाटतं…

“या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो, पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, इन्फेक्शन याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा. प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनोसोक्त’ हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा,” असं हेमांगीने या पोस्टच्या शेवटी म्हटलं होतं.

हेमांगीची ही पोस्टही चांगलीच व्हायरल झालेली.