लॉकडाउनमुळे देशभरातील उद्याने, प्राणीसंग्रहालय, म्युझियम, पार्क आणि झू सर्व काही बंद आहे. त्यामुळे एकीकडे प्राणीसंग्रहालयाकडे पैशांची कडकी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे एकटेपणामुळे जानवरांचा व्यवहारही बदलल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून बंगळुरूच्या बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क (बीबीपी) ने लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना एक कमालीची ऑफर दिली आहे. झू मध्ये असणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना वर्षभरांसाठी दत्तक देण्याचं बीबीपीनं ठरवलं आहे.

उद्यानातील एका आधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्राण्यांना आम्ही दत्तक देत आहोत. यामध्ये तुम्ही काही पैसे खर्च केल्यानंतर ठरावीक कालावधीसाठी प्राणी किंवा पक्षाला दत्तक घेऊ शकता. म्हणजेच त्या कालावधीत तुम्ही त्याचे मालक व्हाल. प्राण्यांना उद्यानात ठेवूनही तुम्ही दत्तक घेऊ शकता. ‘

हात्तीला दत्तक घेण्यासाठी तुम्हाला वर्षाल एक लाख ७५ हजार रुपये मोजावे लागतील. झू मध्ये एकूण २१ हत्ती आहेत. ऑनलाइन जाउन तुम्ही खरेदी करू शकता. तसेच भारतीय किंग कोब्राला वर्षाला दोन हजार रूपये देऊन दत्तक घेऊ शकता. प्राणी आणि पक्षांची आवड असणाऱ्यांना ही एक चांगली संधी अससल्याचे उद्यानातील एका आधिकाऱ्यानं सांगितले. दत्तक घेऊ शकणाऱ्या प्राणी-पक्षांची एक यादी बीबीपीने जाहीर केली आहे.  ,

भारतीय किंग कोब्रा – दोन हजार
अजगर – साडेतीन हजार
जंगली मांजर – पाच हजार
आसामी मकाकला – पाच हजार
ब्लॅक बक -सात हजार ५०० रूपये
सांबार – सात हजार ५०० रूपये
इमू – १००००
spot-billed Pelican – १५ हजार
कोल्हा – २० हजार
अस्वल – ३५ हजार
बिबट्या – ३५ हजार
पाणघोडा – ७५,०००
वाघ – एक लाख
जिराफ – एक लाख
हत्ती – एक लाख ७५ हजार

प्राणी किंवा पक्षांना दत्तक घेणाऱ्यांना किंवा केअर टेकर होणाऱ्यांना बीबीपीकडून खास ऑफरही देण्यात आली आहे. लॉकडाउननंतर उद्यानात येण्यासाठी मोफत पास देण्यात येणार आहे.