News Flash

Video : दोस्त असावा तर असा, श्वानाने वाचवले चिमुरडीचे प्राण

सध्या सोशल मीडियावर या कुत्र्याचं प्रचंड कौतुक होत असून तो साऱ्यांसाठी स्टार झाला आहे.

मैत्रीची व्याख्या एका शब्दात सांग कठीण आहे. त्यामुळे मैत्री ही संकल्पना कधी शब्दात व्यक्त करायची नसते. ती अनुभवायची असते. अनेक जण आपल्या मैत्रीखातर काहीही करायला तयार होतात. मात्र एखादा श्वान अर्थात कुत्रा आपल्या मैत्रीसाठी स्वत:च्या प्राणाची बाजी लावत असेल तर साऱ्यांनाच अचंबित व्हायला होईल. एका श्वानाने आपल्या मैत्रीखातर समुद्राच्या लाटांमधून एका लहान मुलीचे प्राण वाचविल्याचं समोर आलं आहे. सध्या या श्वानाचा आणि लहानग्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर या कुत्र्याचं प्रचंड कौतुक होत असून तो साऱ्यांसाठी स्टार झाला आहे. बोलता न येणारा पण आपल्या भावना समजून घेणारा हा कुत्रा आपल्या लहानग्या मैत्रिणीला वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

फ्रान्समधील एका समुद्रकिनारी एक लहान मुलगी आपल्या कुत्र्यासमवेत पाण्यात खेळत होती. यावेळी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळ ही लहानगी पाण्यात ओढली जाईल या भितीने तिच्या पाळीव श्वानाने तिला समुद्रकिनाऱ्यावर खेचत आणलं. विशेष म्हणजे या श्वानाच्या मनात चिमुरडीवर असलेलं प्रेम पाहून उपस्थित साऱ्यांनाच त्यांच कौतुक वाटलं. दरम्यान, हा व्हिडिओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेकांनी तो शेअरही केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 3:51 pm

Web Title: adorable moment a dog rescues a little girl from ocean waves
Next Stories
1 1322 कोटींची लॉटरी जिंकताच पतीला सोडून चोराशी केलं लग्न !
2 उद्यापासून JioPhone 2 चा फ्लॅशसेल सुरू, कशी करायची नोंदणी?
3 #IndependenceDayIndia : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त ट्विटर इंडियाचा मराठीतूनही हॅशटॅग
Just Now!
X