“वर पाहिजे. चांगली नोकरी, वर्ण गोरा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा, २५ ते ३० वर्षे वयोगटातला, धर्म आमूक हवा, जात तमूक हवी…”,अशा जाहिराती आपण अनेकदा वाचल्या असतील. लग्नासाठी मुला-मुलींच्या अपेक्षा सांगणाऱ्या या जाहिराती सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असतात. पण सध्या जी जाहिरात चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या वधूची अपेक्षा आहे की वर न पादणारा आणि ढेकर न देणारा असावा. बरं, वधूही कशी आहे तर….वाचा पुढे सविस्तर!

या वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. असं काय आहे या जाहिरातीमध्ये? तर ही जाहिरात देणारी मुलगी म्हणते की, मला लग्नासाठी देखणा, २५-२८ वर्षे वयोगटातला, मोठा व्यवसाय, बंगला किंवा २० एकरात विस्तारलेलं फार्म हाऊस असलेला, स्वयंपाक येत असलेला, ढेकर न देणारा, न पादणारा नवरा हवा आहे. अभिनेत्री रिचा चड्ढाने ही जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स


बरं ह्या मुलीच्या अपेक्षा एवढ्या आहेत तर जाणून घ्या ही मुलगी आहे तरी कशी? ही मुलगी स्वतःबद्दल लिहिते, फेमिनिस्ट, ३० वर्षांवरची सुशिक्षित मुलगी, छोटे केस, पियर्सिंग केलेली, भांडवलशाहीच्या विरोधात काम करणाऱी.
ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

बीबीसीने याबद्दल प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की हा एक प्रँक आहे. या महिलेच्या मित्रमैत्रिणींनी तिची चेष्टा करायची म्हणून अशी जाहिरात छापून आणली आहे. या जाहिरातीत दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधल्यावर ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, या महिलेच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त तिचा भाऊ आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी मिळून ही थट्टा केली आहे.