20 April 2019

News Flash

सारी धडपड डॉक्टर होण्यासाठी!

एकीकडे रडणारं बाळ तर दुसरीकडे परीक्षा देतानाचा तिचा फोटो व्हायरल

अफगाणीस्तानातील एका खेड्यात राहणाऱ्या २५ वर्षीय जहान ताबचा हा फोटो होता.

एकीकडे रडणारं बाळ तर दुसरीकडे शिकण्याची जिद्द अशी तारेवरची कसरत करणाऱ्या अफगाण महिलाचा फोटो गेल्या आठवड्यात वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अफगाण महिलांच्या वाट्याला सामान्य स्त्रियांसारखं आयुष्य कधी आलंच नव्हतं. नेहमीच उपेक्षा पदरात बाळगून फक्त चूल आणि मूल पुरताच मर्यादीत राहणाऱ्या अफगाण महिलांचं आयुष्य हळूहळू बदलत चाललं आहे. हा फोटो म्हणजे त्यांनी समाजाकडून नको इतकी लादलेली बंधनं मोडण्यासाठी उचलेलं पाऊल होतं.

Chipko Movement :‘पेड कटने नही देंगे’, गोष्ट त्या काळच्या जंगल प्रेमाची!

अफगाणीस्तानातील एका खेड्यात राहणाऱ्या २५ वर्षीय जहान ताबचा हा फोटो होता. परीक्षा देण्यासाठी खेड्यापासून ८ तासांचा प्रवास करत जहान नसीरखोश्वॉ शैक्षणिक संस्थेत आली होती. जहानला शिकून डॉक्टर व्हायचं आहे. वयाच्या अठराव्या वर्षी तिचं लग्न झालं. जहानची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ती म्हणते ‘मला डॉक्टर व्हायचं आहे. अफगाणीस्तानात समाजात जे स्त्रियांचं स्थान आहे ते मला बदलाचं आहे. मला बंधनांची चौकट मोडायची आहे. चूल आणि मूलपुरता मर्यादित न रहता मला घरातून बाहेर पडायचं आहे. इथल्या स्त्रियांसाठी मला काहीतरी करायचं आहे. त्या दिवशी माझ्यासोबत माझं मुलं होतं. ते रडू लागलं. मी महत्त्वाची परीक्षा देत होते. पेपर लिहायचा थांबवला असता तर माझी संधी हुकली असती म्हणूनच मी त्याला मांडीवर निजवून पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला’ असं जहान एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

Tulip Garden : ‘या’ व्यक्तीने साधली स्वर्गाहूनही सुंदर नंदनवन फुलवण्याची किमया

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं पहिली तीन वर्षे तिला शिक्षण घेता आलं नाही. पण तिची शिकण्याची जिद्द पाहून अनेकांनी तिला आर्थिक मदत देऊ केली आहे. मला सगळं सोडून आता पुढे जायचं आहे. माझं भविष्य घडवायचं आहे असंही जहान म्हणाली. जहाला तीन मुलं आहेत. परीक्षेला येताना तिनं आपल्या दोन मुलांना घरीच ठेवलं होतं तर दोन महिन्याच्या चिमुकल्याला मात्र ती परीक्षा केंद्रावर घेऊन आली होती.

First Published on March 26, 2018 2:17 pm

Web Title: afghan woman nursing her baby while writting exam wants to become doctor