15 February 2019

News Flash

‘गोल्डनगर्ल’ विनेश फोगाटने विमानतळावर प्रियकरासोबत केला साखरपुडा

 जकर्तामधून माघारी आल्यानंतर गोल्डन गर्ल विनेशच्या स्वगतासाठी मित्र आणि कुटुंबिय आले होते

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. २१ ऑगस्ट रोजी विनेशने सुवर्णपदकाची कमाई केली. सुवर्णपदाकासह विनेशचे शनिवारी भारतामध्ये आगमन झाले. दिल्ली विमानतळावरच विनेश आणि प्रियकर विनेशने साखरपुडा केला.

जकर्तामधून सुवर्णपदक जिंकून विनेशचे शनिवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. विनेशने प्रियकर सोमवीर राठीसोबत विमानतळावर साखरपुडा केला. प्रियकर सोमवीरने विनेशला आंगठी घालून लग्नाची मागणी घातली. विनेशनेही होकार देत सोमवीरला आंगठी घातली. शनिवारी विनेश फोगाटचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जकर्तामधून माघारी आल्यानंतर गोल्डन गर्ल विनेशच्या स्वगतासाठी मित्र आणि कुटुंबीय आले होते. यावेळीच सोमवीर आणि विनेशने एकदुसऱ्यांना आंगठी घालत साखरपुडा केला. यावेळी त्यांनी केक कापून आनंद साजरा केला.

सोमवीर राठी हा सुद्धा एक कुस्तीपटू असुन तो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता आहे.  विनेश व सोमवीर गेल्या काहीं दिवसांपासून प्रेमात पडले होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आशियाई क्रिडा स्पर्धा असल्याने त्यांनी स्पर्धा संपल्यानंतर लग्न करण्याच ठरवलं होतं. मात्र शनिवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा बाहेरील पार्किंगमध्ये दोघांच्या घरातल्यांनी दोघांचा साखरपुडा उरकून टाकला. यावेळी विमानतळावर अनेक नागरिक उपस्थित होते. विनेशच्या घरातल्यांनी त्या सगळ्यांचे शुद्ध तुपातले लाडू वाटून तोंड गोड केले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी “भारत माता कि जय” च्या घोषणा देत विनेशचे अभिनंदन केले. त्यानंतर संपूर्ण विमानतळ परिसरच ढोलच्या आवाजाने दुमदुमला आणि नागरिकांसह विनेशनेही भांगड्यावर ताल धरला.

‘आम्ही सात वर्षांपासून एकमेंकाना ओळखतो,  आमच्या नात्याबद्दल सर्वांना माहित आहे. ज्यावेळी मी लग्न करेन त्यावेळी सर्वांना सांगेन. सध्या माझे सर्व लक्ष कुस्तीवर आहे. टोकिओ ऑलम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेवर माझे लक्ष आहे. त्यामुळे माझ्या ध्येयामध्ये कोणीही येणार नाही’. असे साखरपुड्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनेश म्हणाली.

First Published on August 28, 2018 10:52 am

Web Title: after historic gold vinesh gets engaged at airport on return