News Flash

अंडे का फंडा सोशल मीडियावर सुपरहिट, मोडला आणखी एक विक्रम

कायलीला मागे टाकलेल्या या अंड्यानं चक्क 'डेस्पासितो' गाण्याचाही विक्रम मोडला आहे.

सध्या सेलिब्रिटीपेक्षाही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे ती एका अंड्याची. या अंड्यानं कायली जेनर सारख्या इन्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या मॉडेलचा विक्रम मोडला तेव्हापासून हे अंडे जणू सेलिब्रिटीच बनलं आहे. आता कायलीला मागे टाकलेल्या या अंड्यानं चक्क ‘डेस्पासितो’ गाण्याचाही विक्रम मोडला आहे.

‘डेस्पासितो’ गाणं हे २०१७ मधलं युट्युबवरील सर्वाधिक पाहिलं गेलेलं गाणं ठरलं होतं. तसंच या गाण्याला युट्युबवर सर्वाधिक लाइक्सही होते. जवळपास ३ कोटीहून अधिक लाइक्स या व्हिडिओला आहेत. या लाइक्सचा विक्रमही ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’नं मोडला आहे. जानेवारीला सुरु झालेल्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील या पोस्टला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख लाइक्स मिळाले आहेत. हे लाइक्स ‘डेस्पासितो’ गाण्याला असलेल्या लाइक्सच्या संख्येपेक्षा दीड कोटींहून अधिक आहे.

हे पेज कोणी सुरू केलं, पेजमागची कल्पना कोणाची हे अजूनही कळलं नाही. मात्र अंडे का फंडा वापरून सुरू केलेलं हे अकाऊंट इन्स्टाग्रामवर अल्पावधितच सुपरहिट ठरलंय हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2019 4:37 pm

Web Title: after kylie jenner egg break despacito music video record
Next Stories
1 २ मांजरींसाठी तो देतो १ लाख रुपये घरभाडे
2 गेल्या ३० वर्षांपासून फक्त चहावर जगतेय ही महिला
3 ‘टोटल धमाल’मधील ही माकडीण घेते आघाडीच्या अभिनेत्रींइतकेच मानधन
Just Now!
X