17 July 2019

News Flash

जेव्हा मैदानावर आलेल्या कुत्र्यामुळे गोल होता होता राहतो

हा कुत्रा धावत आल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला

खेळाचा सामना सुरु असताना कधी कुत्रा तर कधी मांजर नाहीतर कधी एखादा पक्षी आल्याच्या घटना बऱ्याचदा घडताना दिसतात. हे प्राणी सामन्यामध्ये अडचणीचे ठरतात. मग त्यांना हटवण्यासाठी त्याठिकाणी असणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडते. नुकतीच अशी एक घटना घडली. मैदानात आलेल्या कुत्र्यामुळे चक्क एका टीमचा गोल होता होता राहीला. अर्जेंटीनामध्ये सुरु असलेल्या फुटबॉलच्या स्पर्धेदरम्यान हे चित्र पाहायला मिळाले. ज्युवेन्तुद युनिडा आणि डिफेन्सोर्स बेलग्रानो या दोन संघांमध्ये हा फुटबॉलचा सामना रंगला होता. गोल करण्यासाठी एका टीमच्या खेळाडूने बॉल मारला. तो गोलपोस्टमध्येही गेला होता. मात्र त्याचवेळी याठिकाणहून एक कुत्रे वेगाने पळत गेले. बॉल पोस्टमध्ये जायला आणि कुत्रे गोलपोस्टच्याइथे यायला एकच वेळ झाली. त्यामुळे हा बॉल कुत्र्यांच्या अंगावर आपटून गोलपोस्टमध्ये न जाता बाजूलाच गेला.

ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून काळ्या रंगाचा कुत्रा मैदानात धावत येताना आणि त्याला बॉल लागून तो बाजूला गेल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही स्पर्धा ३-० अशा स्कोअरने संपली. हरलेल्या संघाचा एक गोल झाला असता मात्र कुत्रा मध्ये आल्याने तो गोलही हुकला. मात्र हा कुत्रा धावत आल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. २२ सेकंदांचा हा व्हिडियो जवळपास १३ लाख लोकांनी पाहिला असून अडिच हजारहून अधिक जणांनी याबाबत प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका व्टीटर अकाऊंटवर याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

First Published on December 5, 2018 5:52 pm

Web Title: after pitch invading dog saves sure shot goal netizens giving reactions on social media