23 September 2020

News Flash

“सुना है आज समंदर को…”; अमृता फडणवीस यांनी ट्विट केला फोटो

पाहा फोटोच्या माध्यमातून काय दिला संदेश

अमृता फडणवीस (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्या प्रकरणाचा आधार घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुंबई असुरक्षित असल्याचं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एक खास फोटो ट्विट करत विशेष संदेश दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस साडी परिधान करून बसल्या आहेत. “सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है !”, अशा ओळी त्यांनी फोटोसह ट्विट केल्या आहेत. त्याचसोबत #everydayiswomansday हा हॅशटॅग वापरून महिला दिन केवळ एक दिवस नसतो, तर प्रत्येक दिवस हा महिलांचाच असतो, असे त्यांनी लिहिले आहे. याच फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी #courage (धाडस / साहस) हा हॅशटॅगदेखील वापरला असून स्त्री स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम असते असा संदेश त्यांनी फोटो आणि ओळींतून दिला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

सुशात सिंi राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. यावरून मुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली. त्यानंतर, बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय नियमाला धरुन आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले होते.

याच मुद्द्याला धरून अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 7:44 pm

Web Title: after sushant singh rajput death case tweet amruta fadnavis tweet photo in saree gives women empowerment message vjb 91
Next Stories
1 मेसेजवाली लव्हस्टोरी… आवडत्या मुलीला ‘हा’ मेसेज पाठवत सुरु केला संवाद अन् चार वर्षांनंतर…
2 ऑन ड्युटी..! पोलीस कर्मचाऱ्याचा पावसातील हा फोटो होतोय व्हायरल; सुप्रिया सुळेही फोटो शेअर करत म्हणाल्या…
3 CSC मध्ये काम करणारी झोया खान ठरली देशातील पहिली ट्रान्सजेंडर
Just Now!
X