भारताचे ‘चांद्रयान २’चे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हे यान अवकाशात झेपावल्यानंतर अनेकांनी ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अनेक दिग्गज नेत्यांनी, अभिनेत्यांनी आणि कलाकारांनी इस्रोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे सामन्यांनीही ट्विटवरुन या प्रक्षेपणाबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटलं आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतानाच भारतीयांनी शेजरी असणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. भारत चंद्राकडे झेपावला तरी पाकिस्तान अजून आमच्या सीमा ओलांडण्यात व्यस्त आहे असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे. तर काहींनी भारताने यान चंद्राकडे पाठवलं असून पाकिस्तानने पंतप्रधान अमेरिकेकडे पाठवला आहे असा चिमटा शेजाऱ्यांना काढला आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मजेदार ट्विट…

त्यांच्या झेंड्यावर चंद्र आपला चंद्रावर झेंडा

आपण काय लॉन्च करतो आणि ते काय लॉन्च करतात

सध्या पाकिस्तानी जनतेची प्रतिक्रिया

इस्रो हीच भगवान है

यांना येतच नाही

भारताने चंद्रावर यान पाठवले आणि त्यांनी अमेरिकेत पंतप्रधान

पाकिस्तानने पाठवलेले चंद्रयान

पाकिस्तानी लोकांची प्रतिक्रिया

तुम्हाला बॉर्डर ओलांडता येत नाही आम्ही आकाशाला गवसणी घातलीय

बीबीसी आणि पाकिस्तान

दरम्यान, हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज या यानाचे प्रक्षेपण केले. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अनेकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.