05 August 2020

News Flash

‘आईचा पदर, तर आईचा पदरच असतो’; अमिताभ बच्चन झाले भावूक

अमिताभ बच्चन यांच्या डाव्या डोळ्याला त्रास होत होता...

(संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या जीवनातील अनेक घडामोडी ते ट्विटर किंवा फेसबुकद्वारे शेअर करत असतात. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. डोळ्याला झालेल्या त्रासानंतर आलेली आईची आठवण त्यांनी सोशल मीडियावर एका भावूक पोस्टद्वारे शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्रास होणाऱ्या डाव्या डोळ्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि त्यासोबत,
‘डावा डोळा फडफडत होता, लहानपणी ऐकलं होतं की हे अशुभ असतं.
त्यामुळे डॉक्टरांना दाखवायला गेलो, तर डोळ्यात एक काळा ठिपका दिसला.
डॉक्टर म्हणाले…काही नाही वयामुळे झालं आहे…लहानपणी आई पदराचा बोळा करुन, फुंक मारुन, डोळ्याला शेक द्यायची तसं करा, सर्वकाही ठिक होईल.
पण आता आई तर नाहीये…वीजेद्वारे रुमाल गरम करुन शेक घेत आहे.
मात्र त्याचा काही उपयोग नाही
आईचा पदर, तर आईचा पदरच असतो…त्याला दुसऱ्या कशाची सर नाही’ अशा आशयाची पोस्ट केली.

या पोस्टमुळे अमिताभ बच्चन यांना त्यांची आई तेजी बच्चन यांची आठवण येत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांची ही पोस्ट नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडली असून अनेक नेटकरी भावूक प्रतिक्रिया देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 11:41 am

Web Title: after visit to the doctor actor amitabh bachchan tweets maa ka pallu maa ka pallu hota hai sas 89
Next Stories
1 नाद करा…पण आमचा कुठं! मुलीचा नंबर मागणाऱ्या नेटकऱ्याला पुणे पोलिसांचं इरसाल उत्तर
2 Video: क्रिकेटपटूचा अश्लिल डान्स, पबमधील व्हिडीओ व्हायरल
3 My Sudama moment with Lord Krishna; सचिनसोबतच्या फोटोला मोहम्मद कैफची भन्नाट कॅप्शन
Just Now!
X