भारतामध्ये आयपीएलची तयारी सुरु झाली असतानाच शेजारच्या पाकिस्तानमध्ये मात्र पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. पहिले २६ सामने युएईमध्ये खेळवल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये पीएसएलचे सामने खेळवले जात आहेत. पीएसएलच्या माध्यमातून काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार असल्याने अनेक पाकिस्तानी खेळाडू सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून या स्पर्धेची जाहिरात करताना दिसत आहे. मात्र अशीच एक जाहिरात करताना पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि कोटा ग्लॅडिएटर्स संघाचा खेळाडू उमर अकमलने मोठा गोंधळ घातला आहे. आता यावरुनच तो ट्रोल होताना दिसत आहे.

अकलमाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये बोलता बोलता पुढील आयपीएल पाकिस्तानमध्ये होईल असे वक्तव्य केले आहे. २० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अकमल म्हणतो, ‘सरळ गोष्ट आहे कोटाचा संघ कराचीला आला आहे. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत आहोत. यामुळे क्रिकेट चाहते आमच्या संघाला जेवढा पाठिंबा देतील तितकी चांगली कामगिरी संघ करेल. प्रेक्षकांनी अशाप्रकारे प्रत्येक संघाला पाठिंबा दिला तर पुढील आयपीएल (अडखळून) सॉरी पीएसएल इथेच (पाकिस्तानमध्ये) होईल.’ तुम्हीच पाहा हा व्हिडीओ

अनेकांनी अकमलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल केले आहे.

आयपीएल लोकप्रिय आहे

चूक तुमची नाही

सस्ता नशा

स्क्रीप्टेड लाइन्स तरी नीट बोला

यांना पण खेळवा रे

आयपीएलची क्रेझच एवढी

सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएल सुरु असले तरी तिथे आयपीएलची लोकप्रियताही प्रचंड आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तनी खेळाडूंना खेळण्याची परवाणगी बीसीसीआयने मागील अनेक वर्षांपासून नाकारली आहे. आयपीएलचा अवाका हा पीएसएलपेक्षा अनेक पटींने अधिक आहे. अनेकदा पीएसलमधील परितोषिकाची रक्कम आणि स्पर्धेच्या दर्जावरून भारतीय क्रिकेटप्रेमी सोशल नेटर्किंगवर पाकिस्तानला ट्रोल करत असतात. त्यातच आता त्यांना अकमलने आणखीन एक मुद्दा आयताच हाती दिला आहे. जरी अकमल चुकून पीएसएल ऐवजी आयपीएल बोलला असला तरी सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता ही चूक त्याला चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे.