News Flash

जिओ टक्कर देण्यासाठी ही कंपनी देणार मोफत इंटरनेट

मोफत इंटरनेटसाठी 'गुड नाईट' ऑफर

एअरसेलने जिओला टक्कर देण्यासाठी 'गुड नाईट' ऑफर सुरू केली

सप्टेंबरमध्ये  रिलायन्सने आपली जिओ टेलीकॉम सेवा लाँच केली. या सेवेला भारतीय ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मोफत फोर जी इंटरनेट, मोफत कॉल्स आणि एसएमएसमुळे अनेकांनी जिओची सेवा स्विकाराली. पण जिओमुळे इतर टेलीकॉम कंपनीचे धाबे चांगलेच दणाणले. जिओमुळे देशातल्या मोठ मोठ्या टेलिकॉम कंपनींना याचा फटका बसला आहे. त्यांचे ग्राहकही कमी झाले आहेत म्हणूनच जिओला टक्कर देण्यासाठी दरदिवशी प्रतिस्पर्धी टेलीकॉम कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणि ऑफर्स आणत आहेत. आता एअरसेल कंपनीने देखील मोफत इंटरनेट सेवा देणार असल्याचे जाहिर केले आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरसेलने गुडनाइट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रात्री ३ ते ५ या काळात मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. दोन महिन्यांसाठी ग्राहकांना ही ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे ३ ते ५ या काळात ग्राहक गाणी, चित्रपट डाऊनलोड करू शकतात. यासाठी इतर कोणत्याही रिचार्जची गरज भासणार नाही. रिलायन्स जिओ प्राईमचे आतापर्यंत ७.२ कोटी ग्राहक झाले आहेत. स्वस्त किंवा मोफत दरात इंटरनेट मिळत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती जिओला मिळाली. पण जिओमुळे इतर टेलीकॉम कंपन्यांचे मात्र मोठे नुकसान झाले होते. टेलीकॉम क्षेत्रातील अभूतपूर्व यशानंतर आता रिलायन्स जिओ डिटीएच सेवा देखील या महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 3:02 pm

Web Title: aircel launch good night offer to fight reliance jio
Next Stories
1 viral video: काश्मीरमध्ये क्रिकेटपटूंनी सामन्याआधी गायले पाकिस्तानी राष्ट्रगीत
2 रिलायन्स जिओची DTH सेवा सुरूवातीला मोफत?
3 केरळच्या प्रेमात असलेल्या आई-वडिलांनी मुलीचे नाव ठेवले ‘केरळ’
Just Now!
X